Friday, 31 July 2020

चित्रचारोळी (अभ्यास )

चित्रचारोळी

अभ्यास

ऑनलाइन अभ्यासात गुंतला
आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात
वहीपेन हाती घेऊन करे लिखाण
बालक आजचा लॅपटॉप युगात

ऑनलाइन अध्ययनात रमला
बालक व्यस्त लिखाणात
शेजारी लॅपटॉप जणू शिक्षक 
खरी अडचण येते संभाषणात

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( रक्षाबंधन )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय- रक्षाबंधन

औक्षण करते बहीण भावाचे 
राखी,कुंकुम,निरांजन सजले
औक्षवंत,यशवंत, मनिषा घेऊन
रक्षण्या लाज बंधू सज्ज झाले

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

चारोळी ( आनंद )

उपक्रम
चारोळी

आनंद

असाच मिळत नाही आनंद 
सहनशीलता, त्याग जोडीला 
संघर्षाची कास धरुन जिंकावे 
दुजा नसे काही याच्या जोडीला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 30 July 2020

चित्रहायकू ( कौतुक )

चित्रहायकू

कौतुक

चाले संवाद
कौतुकाने खोडात 
प्रेम हास्यात

कापले वृक्ष 
मदतीला तयार
देती साभार 

दिसती सान
घरट्यातली अंडी 
वाजेल थंडी? 

जपू आपण 
शेवट जरी आला
दान पक्ष्याला 

वठलो जरी
पालवी फुटणार 
पुन्हा येणार

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 28 July 2020

चारोळी (कप्पा )

चारोळी
कप्पा

कप्पा मनाचा साठवतो गुपित
कप्प्यात कपाटाच्या रहस्य 
तर  हृदय साठवते प्रितफुले
नदनी येते अलवार एक सुहास्य

श्रीमती माणिक नागावे

चारोळी (निसर्ग गुरु )

उपक्रम

चारोळी

निसर्ग गुरु

निसर्ग गुरु आहे नश्वर जगी
निस्वार्थीपणे ज्ञान दतो जना 
जाणून ही सेवा बदला वागणे 
संवर्धनाची आस लागू द्या मना

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू ( देणगी )

हायकू

देणगी

निसर्ग दाता
देणगी सदा देतो
उपभोगतो 

पाऊस येतो 
चराचर फुलते 
मोदे डुलते

भास्कर देई
जगण्यासाठी उर्जा
वाढतो दर्जा

सागर राजा
बाष्पीभवन होते 
चक्र चालते 

वृक्ष सखाच 
प्राणवायू पुरवी 
दु:ख नुरवी

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू ( कोकणी मेवा )

हायकू

कोकणी मेवा

कोकणी मेवा
आरोग्यास चांगला 
वृक्षा टांगला

उंचच उंच 
कल्पवृक्ष दारात 
सुख घरात 

फळांचा राजा 
हापूस देवगड 
खातो रग्गड

कोकम चाखा
सोलकडी चविष्ट
झाले नादीष्ट

काळ्या मैनेची
जाळी करवंदाची 
गोड चवीची

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 22 July 2020

चित्रचारोळी ( जीवनाची कमान )

उपक्रम

चारोळी

जीवनाचे इंद्रधनुष्य सजवताना 
करावी लागते शरीराची कमान 
बाटल्या उध्वस्त करतात संसार
पण मला सावरतात गपगुमान 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 21 July 2020

हायकू (श्रावण मास )

हायकू

श्रावण सरी 

श्रावण सरी
हलके बरसल्या 
धारा वाहिल्या 

उन पाऊस 
लपंडाव चालला 
खेळ रंगला 

श्रावण धारा
नदी नाले भरले 
भरते आले

सणांचा राजा
उत्साहात साजरा 
आनंद खरा

नव पालवी 
जीवन सुरवात
संघर्ष मात 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 20 July 2020

बालकविता ( पाऊस )

स्पर्धेसाठी

चित्रकविता 

पाऊस

दादा दादा बघ हा पाऊस,
 रिमझिम रिमझिम बरसतो.
छत्री घेउन तू उभा पाठीमागे,
म्हणूनच मी बिनधास्त असतो.

रंगीबेरंगी कपडे घालून ,
आपण दोघे पावसात खेळू.
नको भिजायला पावसात ,
म्हणून एकमेकांना सांभाळू.

हिरवी हिरवी झाडे बघ ती,
कशी आपल्याला बोलवती.
सावलीला त्यांच्या सारीच,
नेहमीच विश्रांती घेती.

उंचावरुन झरे पाण्याचे वाहती,
जवळ आल्यावर बघ मोठे होती.
झरझर वाहतो प्रवाह पुढे,
आवाज आपल्या कानी येती.

टपटप टपटप पाणी पडते,
छत्रीवरुन खाली ओघळते.
कीती छान झाडेवेली,झरे,
मनाला आपल्या मोहवती.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी ( गाभारा )

उपक्रम

चारोळी

गाभारा

जीवनाच्या संध्याकाळी देवा 
बसले तुझ्या गाभाऱ्यासमोर 
मुर्ती तुझी साजरी पाहते एकटक 
विसरून दु:ख होउन भावविभोर 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हिंदी कविता (आया सावन झुमके )

प्रतियोगिता के लिए

बाल कविता

आया सावन झुमके

देखो भैय्या सावन आया,
देखो कैसा सुंदर नजारा ।
लेकर छाता तू खडा है ,
तुही है मेरा बड सहारा ।

निले निले छातेपर गीरती ,
बारीश की छमछम बुँदे ।
मुझपर ना बरसे पाणी ,
प्रयास तेरा भाया मेरे बंदे ।

हरीयाली है चहुओर हमारे,
पत्थरपर मैं बैठा,तू है खडा।
झरझर झरता है झरना देखो,
उपर से कुदता ,दिखता है बडा।

रगबिरंगे पहनकर कपडे,
सावन का मजा ले रहे हैं।
धरतीपर का हर एक प्राणी,
गीत सुख का गा रहे हैं।

टपटप करती बुँदे हमपर,
थरथर काँपेगी काया ।
कुछ ना सोचकर अब हम,
लेंगे मजा प्रकृती की छाया।

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

चित्रचारोळी ( गाभारा )

उपक्रम

चारोळी

गाभारा

जीवनाच्या संध्याकाळी देवा 
बसले तुझ्या गाभाऱ्यासमोर 
मुर्ती तुझी साजरी पाहते एकटक 
विसरून दु:ख होउन भावविभोर 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 19 July 2020

हायकू ( नाळ मातीशी )

हायकू

नाळ मातीशी

नाळ मातीशी 
जुळलेली असावी 
अभंग हवी 

बीज रुजले 
मातीत खोल खोल 
समजू मोल 

खाली धरती 
भास्कर आकाशात 
वाढ जोशात 

अंकुर डोले 
हिरवाई सुखावे 
तराणे गावे 

नाही तुटले
मातीशी ते नाते 
सदा राहते 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी (लेखणी )

उपक्रम
चित्रचारोळी

लेखणी

मनातील भावनांना आकार 
देते शब्दातून ही लेखणी 
वहीतून उमटती भावभावना 
शब्दसूरातून प्रकटे मनिषा  देखणी

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 17 July 2020

हायकू ( पाऊस )

हायकू

पाऊस

पाऊस आला 
वीज चमकणारी
दिसे पांढरी 

काळे आकाश
ढगांनी भरलेले 
खाली वाकले 

पाऊसधारा 
बरसल्या वेगात 
पाणी रस्त्यात 

कडकडाट
विद्युल्लतेचा कानी 
थरार मनी 

बरसणारे
भितीदायक मेघ 
छेदते भेग 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता, अष्टाक्षरी (आला श्रावण महिना )

राज्यस्तरीय अष्टाक्षरी काव्यस्पर्धेसाठी

विषय- आला श्रावण महिना 

आला श्रावण महिना 
मोद मनास जाहला 
चला मजेत राहूया
छान निसर्ग पाहिला 

सरी श्रावणाच्या आल्या 
अंग मोहरुन गेले 
शीत तुषाराने तन 
पुलकित पहा झाले

झोका झाडास बांधला 
वर आकाशी झेपावे 
सारे बांधव भगिणी 
लक्ष्य असे उंच जावे 

सण समारंभ खूप 
लगबग सुरु होते 
माहेरवाशीण खुष 
मायबाप भेट घेते 

हर्ष मनास देतात
श्रावणाच्या जलधारा
झोंबतोय शरीराला 
गार धुंद रानवारा 

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड. जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 16 July 2020

हायकू ( सुर्यास्त )

चित्रहायकू

निसर्ग दृश्य

निसर्ग दृश्य
सुर्यास्ताचे सुंदर
खग अंबर

पित धवल 
भास्कर आकाशात
छाया पाण्यात

नदीत नाव
विहरते सहज 
वेळ गोरज 

उंचच उंच
कल्पवृक्ष दिसती 
काठावरती 

आभा सोनेरी
नभात प्रकटली 
छान दिसली 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 14 July 2020

हायकू (सावली )

हायकू

सावली

पसरे छान
निसर्गात सावली 
मस्त वाटली 

झाली सर्वत्र
उन्हाचीच काहिली 
छाया दिसली 

घेती विश्रांती
प्राणी पक्षी निवांत
वाटले शांत 

गरज वाटे 
दुपारच्या प्रहरी 
आनंद उरी

दारात आहे
वृक्षवल्ली सुंदर
घर मंदिर

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता(आठवण पावसाची)

स्पर्धेसाठी

कविता

विषय-- एकाच छत्रीत दोघे 

शिर्षक- आठवण पावसाची 

बरसला आज बेभान पाऊस, 
जाग्या झाल्या गत स्मृती.
एकाच छत्रीत दोघे आपण, 
आठवण पावसाची ती विस्मृती.

ती पावसाची रीपरीप होती चालू 
आपण दोघे होती एकच छत्री.
नव्हता कुठे आडोसाही तिथे,
मग आली कामी आपली मैत्री.

उघडली छत्री होती एकच,
नव्हती पुरेशी ती दोघांसाठी.
आपसूकच आले जवळ येणे,
आटापिटा न भिजण्यासाठी.

नकळत स्पर्शाने मोहरलो,
नयनी तुझ्या लाली दिसली.
बाहेर पाऊस बरसत होता,
अंगात जणू आग लागली.

थरथरणारे तुझे करकमल,
बाहुवर माझ्या होते स्थिरावले.
हलकेच कर माझे नकळत,
तुझ्या कायेवर होते विसावले.

छत्री होती तरीही भिजलो,
बाहेर पाणी आतून प्रितभाव.
कपडे ओले चिकटले अंगा,
मनी प्रकटली पाहण्याची हाव.

आभार मानावे वाटले पण,
छत्रीचे मानू की पावसाचे? 
निवला पाऊस रिता होउन,
मनात दाटले काहूर भावनांचे.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

शायरी (तनहाई )

शायरी

तनहाई 

तनहाई में अक्सर मायुस होकर 
दो दिल बेतहाशा धडकते हैं
मिलने की ख्वाहीश तो है 
लेकीन मिलने को तडपते है।

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,जिल्हा. कोल्हापूर

Monday, 13 July 2020

चारोळी ( पहाट )

उपक्रम
चारोळी

विषय-पहाट

प्राचीवरती भास्कर येता 
पहाटपावलं अवतरली 
धरणीवरती सोनपिवळ्या
कीरणांची लाली आली 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( उत्साह )

उपक्रम
चारोळी

विषय-उत्साह

यशस्वीतेच्या शिखरावर 
जाण्यास उत्साह कामा येतो 
आवडणाऱ्या कामामध्ये 
वेळ सहजी निघून जातो

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (अंदाज )

चारोळी

अंदाज

अंदाज बांधण्या अनुभव हवा 
शक्याशक्यतेची अटकळ नवी 
खऱ्याखोट्यांची साठवणूक 
व्यर्थ कधीही न जावी 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी ( परतफेड )

स्पर्धेसाठी

चित्रचारोळी

शिर्षक-परतफेड

जरी घातले घाव मजवर खोल
निस्वार्थीपणे परतफेड मी करतो 
झोप निवांत तू कुऱ्हाडीसह 
शेवटपर्यंत मी छायाच देतो 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

षडाक्षरी ( संस्कार )

स्पर्धेसाठी

षडाक्षरी

विषय- संस्कार

शिर्षक- स्वावलंबी माता

मातेचा संस्कार
अनमोल फार 
माझे हे जीवन 
आहे तिचा सार 

स्वावलंबी माता 
नाही झुकणार
कर्तव्य आपले 
चोख करणार 

कष्टाची आवड 
कायम कामात 
सुखच शोधले 
नेहमी श्रमात 

जेष्ठांचा आदर 
मनी बिंबवला 
द्वेष मनातला
जागी थांबवला

आई माझी देवी 
चरणी वंदन 
झिजविले तन
जसे ते चंदन

सभोवती तिच्या
तेजाचे वलय
तिच्यामुळे घर
संस्कार आलय 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता (सुगरणीचा खोपा )

स्पर्धेसाठी

कविता

विषय- सुगरणीचा खोपा

झाडाला टांगला ग बाई 
सुगरणीचा खोपा हा सुंदर 
विणकर कुशल कारागीर 
जणू वाटते पवित्र मंदिर 

काडी काडी जमवून श्रमाने 
आटापिटा बांधण्या आसरा 
नाही दमणूक नाही कंटाळा 
बांधला काळजीने निवारा

कलाकारीचा नमुना असे 
अवर्णनीय वास्तुकला
वादळवाऱ्यातही न तुटता
बिनधास्त वृक्षावर  लटकला

घरटे होता तयार मादी येते 
बारकाईने निरीक्षण करे 
हात फीरवून शेवटचा छान
सुंदर, सुबक,करुन सावरे 

झाली पिल्लांची तयारी 
सुखावले उबदार सदन 
चिवचिवाट ऐकून त्यांचा 
वाटे जणू स्नेहाचे आंदन 

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 11 July 2020

हायकू ( आषाढ मास )

हायकू

आषाढ मास

हिंदू पंचाग 
कर्क राशीत प्रवेश 
मिळे सुयश 

आषाढ मास
चतुर्थ मास म्हणती 
जन जाणती 

दक्षिण देश
सुरु पावसाला 
योग्य शेतीला 

पूजा करती
गौरी मातेची भावे
कवन गावे 

शांत धरणी 
 मशागत करती 
बीया रुजती 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 10 July 2020

चारोळी (अबोला )

उपक्रम

चारोळी

अबोला

न धरता अबोला व्यक्त व्हावे 
मनीच्या भावनांना वाट द्यावी 
मोकळ्या मनातील जागेला 
हळुवार फुलवून घ्यावे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (मायेचा स्वर्ग )

चारोळी
विषय- मायेचा स्वर्ग

शिर्षक- आई

मायेचा स्वर्ग आईच्या अंतरंगी
सुखवी ओलावा ममतेचा मनी
संघर्षमय वादळातही जगी 
सुखावतो मातृत्वाचा धनी 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता ( पैजण )

कविता

पैंजण 

पायी रुणझुणले 
पैंजण सभामंडपी 
ठोके चुकले हृदयाचे 
सावरले यद्यपी 

छुमछुम वाजताना 
छोटी परी आठवे 
निरागसता सहजी
लोचनात साठवे 

पदरव ओळखीचा 
कानात साठवला 
पैंजनाचा गोड रव 
आपसूकच आठवला 

प्रिय सखी माझी पत्नी
चालते ठेक्यात साखळीच्या 
नसते जरी जवळी कधीतरी 
त्या वाटतात ओळखीच्या

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

Wednesday, 8 July 2020

चित्रचारोळी ( नवल )

चित्रचारोळी

नवल

जरी झाले तुकडे माझे 
ओंडक्यातूनही मी बहरतो 
नवल वाटे नवनिर्मितीची 
पालवी, फळासह साकारतो 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू (पाऊस )

हायकू

पाऊस

पाऊस आला
हिरवीगार धरा
वाहतो झरा

वारा वाहिला
गारवा आसमंती 
करा भ्रमंती

आकाशी नभ 
पाण्याने भरलेले 
खाली झुकले 

संततधार 
धरणीने झेलली 
मुक्त हसली 

पाणी वाहीले 
सर्वत्रच मुरले 
गान स्फुरले

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

आठोळी ( गर्व भारताचा )

उपक्रम

आठोळी

विषय - गर्व भारताचा

शिर्षक- देश माझा

देश माझा ,मी देशाचा 
गर्व मला माझ्या भारताचा 
हक्क मागताना लक्षात ठेवीन 
नेहमीच माझ्या कर्तव्याचा

रक्षणकर्त्या शूर सैन्याला 
वंदन मनापासून करते 
त्यागापुढे त्यांच्या अलौकिक 
नकळत नतमस्तक होते 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 7 July 2020

हायकू (अंगण )

हायकू

अंगण

स्वच्छ अंगण 
सदन आरोग्याचे 
सौख्य प्रेमाचे 

असते दारी
तुळस वृंदावन 
शोभे प्रांगण 

बागबगीचा 
औषधी वनस्पती 
आरोग्य देती 

बसती सारे 
संध्याकाळी निवांत
थांबे आकांत 

गोड बोलणे 
शेजाऱ्यांशी थांबून 
स्नेह जपून 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 6 July 2020

चारोळी (विरह )

चारोळी

विरह

विरह कुणाचा कुणाला ?
प्रश्न नेहमीच अनुत्तरित आहे
शंकाकुशंकाचे वादळ मात्र 
सर्वत्र निखळपणे वाहे 

रचना
श्रीमती माणिक नागावे

हिंदी कविता (गुरुमहिमा )

प्रतियोगिता का लिए

कविता

विषय-गुरुमहिमा 

गुरुसेही मिलता ज्ञान,
गुरु ही भंडार ज्ञान का 
रखना है खयाल सदा हमें 
इनके मान और सम्मान का

आदर्शवादी व्यक्तीरेखा गुरु
पदपर जिनके हम है चलते 
राह सत्य की दिखलाते वह
पालन हम है मनसे करते 

वास्तवता का पाठ पढाते जीवन का मार्ग दिखाते 
भविष्य उज्ज्वल बनानेका 
सही तरीका है सिखाते 

गुरुसेही भगवान मिलते 
गुरु हर कोई,जो सिखानेवाला 
अच्छे-बुरे की पहचान देनेवाला
शिष्य का सही चाहनेवाला 

वंदन करते गुरुजनोंको 
गुरु महिमा अगाध इनकी 
पसंद हमें ऋण में रहना 
करना है पार नौका जीवनकी

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( तुकाराम )

उपक्रम
चारोळी
तुकाराम

समाजजागृती अभंगातून केली
तुकारामांनी आपल्या गाथेतून 
परखड शब्दप्रपंचाने जागवला 
निती-अनितीच्या कथेतून

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 5 July 2020

चारोळी ( ऋणानुबंध )

स्पर्धेसाठी

चारोळी

ऋणानुबंध

ऋणानुबंध जपताना रोज 
विश्वासाचं पारडं जड ठेवलं 
म्हणून तर आजपर्यंत नातं 
असच अलवार जपून राहीलं 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी (कोष्टी कीडा )

चित्रहायकू

कोष्टी किडा

जाळे विणतो 
नेटाने भरभर 
जातोय वर

रंग हिरवा
पाठीमागे दिसतो 
प्रकाश देतो 

आठ पायाने 
जाळे तयार होते 
छान दिसते

नाजूक पण 
खूपच दणकट 
आहे चिकट 

देतो सहज
षटकोनी आकार
घर साकार

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 4 July 2020

हायकू (पिवळं सोनं )

उपक्रम

हायकू

पिवळं सोनं

पिवळं सोनं
हळदीला म्हणती
अंगा लावती 

रंग पिवळा 
महत्त्व विवाहात 
हात हातात 

हळद कुंकु 
सौभाग्यवती लेणं
मंगल जीणं

सुर्यप्रकाश
सकाळ संध्याकाळ 
स्वर्ण आभाळ

काळी जमीन
शेतकऱ्यांना सोनं
उदंड देणं

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हास्यकविता ( कीस्से )

स्पर्धेसाठी

हास्यकविता

शिर्षक - कीस्से

काय सांगू एकेक किस्से
हसावं की रडावं नाही कळत
कोण अडाणी कोण सुशिक्षित
कुणीच नाही नियम पाळत

सॅनिटायझरचे चार थेंब
सुरक्षा म्हणून हातावर फवारले
तिर्थ समजून देवाचे त्याने 
थोडे प्राशन थोडे शिरी लावले

खिर दिली नवऱ्याला प्रेमाने
बायकोने पातळ करुन प्यायला
पिल्यानंतर फक्त गोडच पाणी?
अहो,विसरला मास्क काढायला 

सुट्टी काय मिळाली सक्तीची
कामाचे स्वरुपच पालटले 
परंपरागत वाटप कामाचे 
एकमेकांवर सहजच उलटले 

स्वयंपाक घरात पुरुष मंडळी
आजमाऊ लागली पाककृती
लडिवाळ हसत भगिनींनी 
आनंदाने दिली स्विकृती 

कपाटातील कपडे बोलू लागले
सर्व ठीकठाक ना मालकाचं?
खूप दिवस जागचे हललो नाही
अस कीती झाकून रहायचं?

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

चारोळी ( वासरु )

चित्रचारोळी

वासरु

कपाळी रंग पांढरा वासराचा 
पोत्यावर उभा दावणीला बांधला
नाक काळे,खडे कान दिसती
गुज मनीचे सांगे कुणाला ?

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 3 July 2020

चारोळी(ओळख)

चित्रचारोळी
ओळख

पडताना हातावर तूला सावरले
नजरानजर अशी आज झाली 
ओळख नसतानाही मनामध्ये 
गोंधळलेल्या प्रितीला जाग आली

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर