स्पर्धेसाठी
लेख
विषय - दिपावलीनंतर चे चार दिवस
शेवटच्या दिवसापर्यंत शाळा करुन शेवटी एकदा दिवाळीची सुट्टी पडली.मग सुरू झाली लगबग फराळाच्या विविध प्रकारच्या वस्तूंची तयारी करणे.पदार्थ तयार करणे. लक्ष्मीपूजन,पाडवा,भाऊबीज हे सण खासकरून महत्त्वाचे व खूपच घाईगडबडीत व गोंधळात गेले पण तेवढाच आनंद ही देऊन गेले.
हुश्श !! संपली एकदाची दिवाळी म्हणून एक दिर्घ ऊसासा सोडला. पण एकदम मोकळं मोकळं वाटायला लागले. ते आनंदाने गोंधळात सर्वांच्या गोतावळ्यातील क्षण आठवू लागले व मन परत विषण्ण झाले. घरच्या कामात मन गुंतवले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेपराचे गठ्ठे आठवले.अरे बापरे !!! म्हणत ऊठले व गठ्ठे घेऊन बसले.पण कुठलं काय नी कसलं काय. सगळाच विरस ... नको वाटायला लागलं . दिवाळीच्या कालावधीतील दिवस आठवून मन खट्टू झाले. या मनाची समजूत काढणे खूप अवघड गेले. शेवटी एकदाचे हळूहळू त्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात जाऊन बसल्या. नेहमीचे रुटीन सुरु झाले. सुट्टी चे थोडे दिवस राहिले होते ते आपल्या साठी खर्च करायचे ठरविले. दोन दिवसात कुठे सहलीला जाता येईल का याचा विचार सुरू झाला व महाबळेश्वर हे ठीकाण पक्के झाले. आनंदाने सर्व तयारी करुन सर्वजण निघालो. ही कौटुंबिक सहल मनाला आनंद देणारी व सुखावणारी ठरली. निसर्गाच्या सानिध्यात , निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत सर्व ठीकाणे बघून झाली. खूप मज्जा आली. वेण्णा लेकमध्ये नौकानयन मनाला मोहवून, सूखावून गेले. सनराईज पाँईंट पासून सनसेट पाँईंट पर्यंत दिवसभर मजेत घालवला.मनाने व शरीराने फ्रेश होऊन परत घरी आलो. त्या धुंदीत दिवाळी चा शिण कुठल्या कुठे पळून गेला. एकप्रकारची नवचेतना निर्माण झाली. सर्व आप्तेष्टांना भेटून मन तृप्त झाले होते.नव्या ऊभारीने कामाला लागले. पेपराचे गठ्ठे बोलवत होते.त्यांना घेतल व तपासून काढले. निवांत थोडी विश्रांती घेतली.सर्वात महत्वाचे म्हणजे साहित्यिक ग्रुपला जादा वेळ देता आला.लिखाण झाले. वाचणाला व लिखाणाला वेळ मिळाला.त्यामुळे मन आनखीनच खुश झाले.
खरंच दिवाळी सण मोठा नाही आनंदा तोटा असं म्हणावेसे वाटते. हो ते खरंही आहे.जीवनात जगत असताना असे सुखदुःखाचे प्रसंग येतात ते जीवन सुसह्य करण्यासाठीच . चला तर मग लागा नव्या ऊमेदीने,ऊत्साहाने कामाला.जीवन यशस्वी करण्यासाठी सज्ज होऊया.
लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment