उपक्रम
शिर्षक-- याल का राजे ?
हाल माझ्या देशाचे
पहाल का राजे
पुन्हा एकदा फिरुन याल का राजे ? ।। धृ ।।
दिला संस्कार आपल्याला माता जिजाऊने,
ज्योत राष्ट्रप्रेमाची पेटवली आपल्या अमोघ वाणीने,
रुप साजरे दिसेल का आपले बाळराजे ।। 1 ।।
मानली माता आपण परस्त्रीला,
आज बळी जाते तीच रस्त्याला
जर नाही लागली ती हाताला
हवेत बदलायला हे विचार खुजे ।। 2 ।।
बांधली मोट आपण सर्वांची
सजली भिंत आज जातीधर्माची,
गरज मानवतेच्या आचरणाची
शोधण्या उत्तर याल का माझे ? ।। 3 ।।
केला चौरंगा नराधमांचा
बाजार मांडलाय येथे यातनांचा
नाही वाली कोणत्याही भावनांचा
कधी संपतील हे विचार खुजे ।। 4 ।।
पुन्हा एकदा फीरुन याल का राजे ?
जयजयकार तुमचा आज करती सारे
आचरणात कार्य आणले तर होईल बरे
परके झालेत येथे सारेच सगेसोयरे
खोट्यांचाच डंका चौफेर का वाजे ?
पुन्हा एकदा फीरुन याल का राजे?
कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530
No comments:
Post a Comment