Tuesday, 11 February 2020

कविता ( अपघात )

स्पर्धेसाठी

कविता

विषय- अपघात

कर्णकर्कश आवाज कानी आला
पाठोपाठ कींकाळ्यांनी आसमंत चिरत गेला.
जनसमुदाय धावला त्वरेने
पाहून दृश्य थिजून गेला.

अपघात होता झाला नुकताच
वाहनांचा चक्काचूर होता झाला
थारोळे रक्ताचे मन गोठवून गेला.
आपसूकच हात डोळ्यावर गेला,
तळमळत होते जखमी दोघे
याचना मदतीची डोळ्यात 
धास्ती पोलीसांची मनामनात
जाऊ का नको मदतीला प्रश्न जनात

असली कसली व्यवस्था जगी
मनातच चरफडत लोक होते
धाडसाने पुढे मदतगार आले
वास्तपुस्त कुटुंबीयांची केली.
कळवून त्यांना मदत सुरु झाली

वेळेत आलात डॉक्टर बोलले
पराकाष्ठा प्रयत्नांची करु लागले
आयुष्याची दोरी बळकट फार
जीवनाचा पडला गळी हार
श्वास सुटकेचा मग सर्वांनीच सोडला

नको घाई रस्त्यावरून जाताना
जो तो एकमेकांना सांगू लागला
दैनंदिन जीवन सुरु झाले
वेगावर मर्यादा दिसू लागल्या
पुढच्यास ठेच मागचा शहाणा
बोल अनुभवाचे खरे वाटछ लागले.

कवयित्री C R
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

No comments:

Post a Comment