स्पर्धेसाठी
चित्रकाव्य
निरागस नजर
तुझी निरागस नजर ,
घायाळ मजला करते .
विणायचा सोडून गजरा ,
मीही तुलाच पाहते .
माझ्या गोज-या पाडसा ,
नाही तुला रे सोनपाळणा .
कसा निवांत पहुडला ,
माझा देखणा खेळणा .
सुई धाग्यात विणते ,
मी सुगंधी मोगरा .
पोटासाठी विकते मी ,
शुभ्र-धवल गजरा .
कळ्या मोग-याच्या ,
गुंफल्या मी साज-या .
तुझ्या नजरेने त्याही ,
झाल्या कशा हास-या .
मांडला संसार मी ,
असा ऊघडा रस्त्यावर .
भिस्त असे माझी राजा ,
फक्त बाळा तुझ्यावर .
✍ कवयित्री ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment