स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
पोरकी मुले
असहाय्यतेचे जीणे जगतो ,
पहा पोरकी आम्ही मुले .
उगाच म्हणती सर्व जगी ,
मुले ही देवाघरची फुले
आश्रीत आम्ही या जगात ,
स्वताःचे असे कुणी नसे .
उपासमारीने हैराण झालो,
मनी फक्त अन्नच दिसे .
भाऊ बहीण ही दीनवाणी ,
झाली दशा केविलवाणी .
विचार करुन थकला जीव,
भाजले धुळपाय आनवाणी.
ना घर , ना दार आम्हा ,
फाटक्या गठ-यांचा आसरा
त्यापासूनच तयार केलाय ,
बसण्यास निराधार सहारा.
भविष्याची चिंता नसे आम्हा
आजच्या पोटाची खरी चिंता
नको फक्त सहानुभूती खोटी
हवी ठोस कारवाई आता .
✍ कवयित्री ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment