स्पर्धेसाठी
अष्टाक्षरी
विषय-,शब्द मनी मांडताना
शिर्षक- शब्दफुले
शब्द मनी मांडताना
ओघळली शब्दफुले
भावनांचा बांध सारा
विचारांचे शब्दझुले
शब्द मनी मांडताना
कल्पनांची बरसात
अलंकार शब्दातीत
मनावर करी मात
शब्द मनी मांडताना
कवितेत उतरले
समजून अर्थ घेता
भावगर्भ उमजले
शब्द मनी मांडताना
लेखणीची लिपी झाली
जीवनात जगताना
भावनांना जाग आली
सार सारे आयुष्याचे
लिहताना व्यक्त झाले
भाववेडे मन धावे
शाईतून उतरले
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment