काव्यस्पंदन राज्यस्तर समुह 02
दैनंदिन उपक्रम लेखन
काव्यप्रकार - बालगीत लेखन
विषय- पक्षी
शिर्षक- कावळा
वर्ण 12
काव काव करत आला कावळा
रुप आहे काळे म्हणती बावळा ।। धृ ।।
ऐकवती गोष्टी आई अन् आजी ।
खाऊ घालती मला भाकरी भाजी ।।
कावळ्याचे नावाने झोपवी बाळा ।। १ ।।
बसतो कौलावर नी झाडावर।
शोधत राहतो तो खायला फार ।।
हलवून दाखवतो एक डोळा ।। २ ।।
हाकलून देती सारे घरदार।
चोच याची आहे खूप धारदार।।
खूपच खराब कावळ्याचा गळा ।। ३ ।।
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment