काव्यस्पंदन राज्यस्तरीय समूह आयोजित रविवारीय स्पर्धा
काव्यप्रकार-अष्टाक्षरी
विषय-उगवला रविवार
सप्ताहाच्या शेवटाला
उगवला रविवार
आनंदाने झोपी गेलो
बाकी सारे गपगार
रोज रोज तेच तेच
काम करुन शिणतो
कधी मिळेल आराम
आस मनीची ताणतो
वाट पाहती सारेच
शेवटच्या दिवसाची
रविवार हक्क देतो
मनसोक्त वागण्याची
भार हलका करतो
उत्साहाने गाणी गातो
सुख मिळवण्यासाठी
सुखी सदरा घालतो
नष्ट होताच आळस
उत्सुकता कामी येते
दिवसाची सुरवात
सहजच सुरु होते
गोडधोड मिळे खाऊ
बेत सुगरण करी
ताव मारून यथेच्छ
म्हणू पांडुरंग हरी
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment