शब्दसेतू साहित्य मंच
रविवारीय स्पर्धेसाठी
विषय-बागुलबुवा
शिर्षक-हतबलता
रोखण्यासाठी एखादी गोष्ट,
दाखवली जाते भिती खूप.
बागुलबुवा म्हणती त्याला,
पालटते मग सर्वांचेच रुप.
हतबलता मनी थैमान घालते,
खरे रुप ध्यानी नाही येत.
कशासाठी उभा जीवनात,
नकळत प्रश्नात हरवून जातं.
न्युनगंड ही म्हणती याला,
अभाव आत्मविश्वासाचा असतो.
बाणवावी सकारात्मकता,
प्रयत्नांती परमेश्वर दिसतो.
दुर्लक्षित करण्या गोष्ट एखादी,
महत्त्व बागुलबुवाचे वाढते.
आपसूकच महत्वाची बाब,
सहजपणे मागे पडते.
व्यक्तीगणिक रुप बदलते,
क्रिया-प्रतिक्रिया वेगवेगळ्या.
कुणी घाबरते कुणी दडपण घेते
कृती होती सर्व आगळ्या.
चित्रविचित्र आकारातून,
वयोगटानुसार प्रकट होते.
समयसूचकता जया अंगी,
यशपताका हाती येते.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment