Tuesday, 29 September 2020

चारोळी (हृदय )

हृदय

हृदयातील स्पंदने ऐकताना
 मिळते प्रोत्साहन जगण्यास
संवेदनशील मना येते उभारी
उर्मी नवसंजीवनी येण्यास

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 27 September 2020

हायकू ( जंगलराज )

चित्रहायकू

हायकू

जंगल राज

जंगल राज
अधिवास प्राण्यांचा
शोध सुखाचा

शांतता असे
कीलबिलाट कानी
आनंद मनी

वाहते पानी
इंद्रधनुष्य दिसे
स्वर्गच वसे

निवांत दिसे
वाघ करे आराम
दु:ख विराम

मर्कट लिला
गजराज जलात
चित्ता तालात

सुसरबाई
पाण्यात पहुडली 
संधी शोधली

गर्द निसर्ग 
हिरवीगार झाडे
फुलांचे सडे 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

अष्टाक्षरी ( शब्द मनी मांडताना )

स्पर्धेसाठी

अष्टाक्षरी

विषय-,शब्द मनी मांडताना

शिर्षक- शब्दफुले

शब्द मनी मांडताना
ओघळली शब्दफुले
भावनांचा बांध सारा
विचारांचे शब्दझुले 

शब्द मनी मांडताना
कल्पनांची बरसात
अलंकार शब्दातीत
मनावर करी मात

शब्द मनी मांडताना
कवितेत उतरले
समजून अर्थ घेता 
भावगर्भ उमजले 

शब्द मनी मांडताना
लेखणीची लिपी झाली
जीवनात जगताना
भावनांना जाग आली

सार सारे आयुष्याचे 
लिहताना व्यक्त झाले
भाववेडे मन धावे
शाईतून उतरले

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

मुक्तछंद ( नावडते मज )

रविवारीय साहित्य लेखन स्पर्धा क्र.13 
स्पर्धेसाठी

मुक्तकाव्य

विषय-नावडते मज

शिर्षक- नकोच मला

सहजासहजी फिरताना मजला,
दिसले वाटे जे नकोच मला
सतत अत्याचार सहन करणारी
दिसली अबला आक्रंदताना.
नावडते मज साहणे अन्याय

सबलेला पढवून तू अबला
सतत माथी मारला जातो 
परंपरागत रुढार्थाने पुढेच जाती
अंगवळणी पडते नकळत.
पिढ्यानपिढ्या चालत जाते
सोशिकता वाढीस लागते 
कळतच नाही होतोय अन्याय
कधी संपणार ही शृंखला ?

नावडते मज दृष्टी पाहण्याची
सतत स्त्रीला टोचून बोलल्याची
सतत कमी लेखण्याची
टोचून बोलून हैराण करण्याची 
भेदभाव ,सापत्न वागणुकीची
मानखंडना करण्याची .

प्रतिकारास का घाबरते ?
समजत नाही मनाला
गरज पाऊल उचलण्याची 
दाद मागण्याची...

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 25 September 2020

हायकू ( वारा घालतो शिळ )

हायकू

वारा घालतो शीळ

रानावनात
वारा घालतो शीळ
पडतो पीळ

आवाज येतो
वाहताना तो वात
कंप उरात

कानी ऐकता
सुस्वर आवाजाचे
तरु वनाचे

झाडे डोलती
नाचती आनंदात 
मोद अंगात

थरथरती
अलगद पाने फुले
भूवरी आले

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 22 September 2020

चित्रहायकू ( शोभायमान )

चित्रहायकू

शोभायमान

शोभायमान
घर आहे सुंदर
मन मंदिर

बाग फुलांची
रंगीबेरंगी फुले
मोहित झाले

गुलाबी छत
टुमदार सदन
हास्य वदन

हिरवी झाडी
झुपकेदार दिसे
सुंदर दिसे

मनमोहक
दृश्य निसर्गाचे
फुलपानांचे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी(योद्धा )

चारोळी

योद्धा

संघर्षाला साहसाने सामोरे
 निर्भयपणे योद्धा जातो 
सहजपणे मग संकटे अलगद
माघार घेती अन् तो यशस्वी होतो

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 21 September 2020

षडाक्षरी(जिंकू रणांगण )

उपक्रम

षडाक्षरी

विषय-- जिंकू रणांगण

ध्येयासक्त वीर
आस मनातली
पक्काच निर्धार
जिंकू रणांगण

सैनिक सतर्क
राहतो सदैव
वाकडी नजर
शत्रूचे दुर्दैव  

जिंकू रणांगण
हृदयात जोश
समर्पण भाव
उडतात होश

जिंकू रणांगण
मनीची कामना
पूर्ण करण्यास
रिपूंशी सामना

संकट महान
आज दारी आले
उपाय थकले
हतबल झाले

प्रयत्न अपार
रहा बिनघोर
आपणच जाई
नाचे मनमोर

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

दुहेरी चारोळी (नवदांपत्य )

दुहेरी चारोळी

नवदांपत्य

शेरवानी हिरवी गारवा देते
तलम वस्त्र उबदार वाटते
गौरवर्ण अन् हास्य अवखळ
प्रियतमेवर कटाक्ष टाकते

हिरवी कंचुकी धवल साडी
नववधू अलंकाराने नटली
सुवासिक गजरा शोभे कुंतल
अलवार लाज नजरेत साठली

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड. जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 20 September 2020

कविता (उगवला रविवार )

काव्यस्पंदन राज्यस्तरीय समूह आयोजित रविवारीय स्पर्धा

काव्यप्रकार-अष्टाक्षरी

विषय-उगवला रविवार

सप्ताहाच्या शेवटाला
उगवला रविवार
आनंदाने झोपी गेलो
बाकी सारे गपगार

रोज रोज तेच तेच
काम करुन शिणतो
कधी मिळेल आराम 
आस मनीची ताणतो

वाट पाहती सारेच 
शेवटच्या दिवसाची
रविवार हक्क देतो 
मनसोक्त वागण्याची

भार हलका करतो
उत्साहाने गाणी गातो
सुख मिळवण्यासाठी
सुखी सदरा घालतो

नष्ट होताच आळस
उत्सुकता कामी येते
दिवसाची सुरवात
सहजच सुरु होते

गोडधोड मिळे खाऊ
बेत सुगरण करी
ताव मारून यथेच्छ
म्हणू पांडुरंग हरी 

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता (हतबलता )

शब्दसेतू साहित्य मंच

रविवारीय स्पर्धेसाठी

विषय-बागुलबुवा

शिर्षक-हतबलता

रोखण्यासाठी एखादी गोष्ट,
दाखवली जाते भिती खूप.
बागुलबुवा म्हणती त्याला,
पालटते मग सर्वांचेच रुप.

हतबलता मनी थैमान घालते,
खरे रुप ध्यानी नाही येत.
कशासाठी उभा जीवनात,
नकळत प्रश्नात हरवून जातं.

न्युनगंड ही म्हणती याला,
अभाव आत्मविश्वासाचा असतो.
बाणवावी सकारात्मकता,
प्रयत्नांती परमेश्वर दिसतो.

दुर्लक्षित करण्या गोष्ट एखादी,
महत्त्व बागुलबुवाचे वाढते.
आपसूकच महत्वाची बाब,
सहजपणे मागे पडते.

व्यक्तीगणिक रुप बदलते,
क्रिया-प्रतिक्रिया वेगवेगळ्या.
कुणी घाबरते कुणी दडपण घेते
कृती होती सर्व आगळ्या.

चित्रविचित्र आकारातून,
वयोगटानुसार प्रकट होते.
समयसूचकता जया अंगी,
यशपताका हाती येते.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 19 September 2020

चारोळी ( पालवी )

उपक्रम

चारोळी

विषय- पालवी

पालवी पल्लवित झाली
गोठलेल्या दु:खी भावनेची
दारी वृद्धाश्रमाच्या पाहिली 
पावले रक्ताच्या नात्याची 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

बालगीत ( कावळा )

काव्यस्पंदन राज्यस्तर समुह 02 
दैनंदिन उपक्रम लेखन
काव्यप्रकार - बालगीत लेखन

विषय- पक्षी
शिर्षक- कावळा

वर्ण 12 

काव काव करत आला कावळा
रुप आहे काळे म्हणती बावळा ।। धृ ।।

 ऐकवती गोष्टी आई अन् आजी ।
खाऊ घालती मला भाकरी भाजी ।।
कावळ्याचे नावाने झोपवी बाळा ।। १ ।।

बसतो कौलावर नी झाडावर।
शोधत राहतो तो खायला फार ।।
हलवून दाखवतो एक डोळा ।। २ ।।

हाकलून देती सारे घरदार।
चोच याची आहे खूप धारदार।।
खूपच खराब कावळ्याचा गळा ।। ३ ।।

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 18 September 2020

चारोळी (मराठवाडा मुक्तीसंग्राम )

सावली प्रकाशन समुह आयोजित झटपट चारोळी स्पर्धेसाठी

चारोळी

विषय- मराठवाडा मुक्तीसंग्राम

स्वामी रामानंद तिर्थांची कृपा
मराठवाडा मुक्तीसंग्राम झाला
स्वातंत्र्यवीरांच्या शौर्याने सत्वर
स्वातंत्रसुमनांची गळा माला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी (संभाषण )

उपक्रम

चित्रचारोळी

संभाषण

देवालयाच्या दारी भक्तांच्या गप्पा
आधुनिकतेसमोर अनुभव थोर
मोबाईलच्या दुर संभाषणापेक्षा
प्रौढ गप्पात गुंगती बिनघोर

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हिंदी कविता ( फुलोंका चमन )

काव्यप्रेमी हिंदी काव्यगोष्ठी प्रस्तुत उपक्रम के लिए चित्रकाव्य

शिर्षक- फुलों का चमन

रंगबिरंगे फुल खिले हैं,
फुलों के इस चमन में।
एक पपिहा चहक उठा है,
आनंदी मन के आँगन में।

निले अंबर के नीचे सजी है,
प्यारी सी बगीया जरबेराकी।
पिले,लाल,गुलाबी रंगोंकी,
क्यारी प्यारी लगती फुलोंकी।

हरित पर्ण शोभायमान करती,
आँखोंको शितलता देकर।
उँची उँची शाखांओंपर अपने,
पवन हिलोरे देते आनेपर।

निले सफेद मेघ हँसते हैं,
चाहत रंगोंकी मन में भरकर।
खुब सजा है बगीया अपना,
नाचे लोग आनंद विभोर होकर।

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी( आई )

उपक्रम

अष्टाक्षरी चारोळी

विषय- आई

आई माझी स्वावलंबी
संस्काराची असे खाण 
आत्मभान जागवते 
हृदयात तिला मान 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 16 September 2020

चारोळी (अंकुरला कोंब )

चारोळी

  अंकुरला कोंब

अंकुरला कोंब नवतेजाने
पालवी फुटली उत्कर्षासाठी
धन्य माती रुजले उदरी बी
झेपावे वरी हरित क्रांतीसाठी

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता (बद्दीउजमा खावर )


 कविता

बद्दीउजमा खावर

मी तर प्रसिद्धी परान्मुख ,
शायर बद्दीउजमा खावर.
साहित्य सेवेत आयुष्यभर,
कुडीत जीव असे तोवर.

मनातल्या भावनांचा खेळ,
मांडला मी शब्द लालित्यातून
कल्पनेचा कुंचला प्रकटला,
शब्दालंकाराचे लेणे लेवून.

प्रसवून विचारांचे मोती,
गुंफला मनोभावनांचा हार.
सुवासिक अर्थाचा परीमळ,
झुलवे मना असा अलवार.

नश्वर जरी मी जीवंत राहीन,
लेखन माझे ठरे अजरामर.
वंदन रसिका प्रेमभावे,
ठेवा चिरंतन राहे सदैव अमर.

चित्रचारोळी (संसार )

उपक्रम

चित्रचारोळी

संसार

पाईपातला संसार स्थिरावला
मायबापाच्या प्रेमळ कुशीत 
बाप झेलतो उनपाऊस नेटाने
माय आगतिक गरीबीच्या मुशीत

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 14 September 2020

चित्रचारोळी ( निखळ हास्य )

चित्रचारोळी

निखळ हास्य


निखळ हास्यात दडले काय?
कुंतल साक्षीला उभे बाजूला
मेंहदी,घड्याळ, शोभे हाती
लाल ओढणी,झुमका डोलला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू ( अभयारण्य )

हायकू

विषय - अभयारण्य

अभयारण्य
अभय श्वापदांना
विहरताना 

खास प्राण्यांचे
राखून ठेवलेले
स्वच्छंद झाले

सुरक्षा दिली
आनंदी वनचर 
शांत निर्झर

विपुल झाडी
हिरवेगार वन
भेटती जन

राखीव क्षेत्र
दुर्मिळ जातीसाठी
सुरक्षा मोठी

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा, कोल्हापूर

Sunday, 13 September 2020

चित्रचारोळी (जिवनसंघर्ष )

सावली प्रकाशन समुह आयोजित चित्रचारोळी स्पर्धेसाठी

जीवनसंघर्ष

भुकेजलेले बालक रडते
ताई जीवनसंघर्षासाठी राबते 
साच्यात विटांच्या घालून माती
सुकण्यासाठी मांडून ठेवते

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 5 September 2020

चारोळी (आदर्श शिक्षक )

चारोळी

आदर्श शिक्षक

व्यक्तीमत्व विकासासाठी लढतो
आदर्श शिक्षक मागे न हटतो 
आली कीतीही संकटे तरीही
नेटाने पुढेपुढेजाण्यास झटतो

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( शिक्षक )

चारोळी

शिक्षक

अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा
शिक्षक घडवतो ज्ञानपिपासू
संवेदनशील मनाने ज्ञानार्जन करतो
दु:ख उरी पण ओठांवर हसू 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 2 September 2020

हायकू( कल्पवृक्ष )

हायकू

कल्पवृक्ष

दारात उभा
कल्पवृक्ष साजरा
वाटतो बरा

उंचच उंच
ताड माड वाढला
आकाशी गेला

अंग प्रत्यंग
उपयोग करती
नारळ खाती

सागर तीरी
सौंदर्य खुलवतो
आनंद देतो

आरोग्यासाठी
वापरती शहाळे
रुप वेगळे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर