Sunday, 31 December 2017

मिठी सैल झाली

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी

2) मिठी सैल झाली

आला पहाटवारा ,
जागवून मज गेला .
स्वप्नांची ती मग आता ,
मिठी सैल झाली .

गुंतले मन होते ,
स्वप्नांत काल माझ्या .
कवेत मी गुंफले ,
झाले मन ताजे तुझे .

आळवले सूर प्रितीचे ,
गाईले नवे तराणे ,
शब्दां शब्दांतून फुलले ,
आज माझे नवे गाणे .

घेतले शब्द अलगद ,
उचलून मी मिठीत .
मिठी सैल झाली ,
शब्द धरले ओंजळीत .

हळुच मारली फुंकर ,
शब्द लागले धावायला .
ऐकुन शब्दसुरांना ,
सारेच लागले गायला .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

No comments:

Post a Comment