Sunday, 31 December 2017

जुने ते सोने

स्पर्धेसाठी

    जुने ते सोने

सरले वर्ष सतरा ,
सूर्य मावळतीचा साक्षिला.
स्वागत करुया अठराचे ,
हजर सारे दिमतीला .

जुने ते सोने असते ,
गेल्यावर ते लक्षात येते.
संकल्प धरुन नविन ,
मनात गुंफण घालते .

माणसे जुनी काळ जुना,
माणुसकी जवळ होती.
सहकार्यवृत्ती अंगी होती,
संवेदना जागृत होत होती.

खरी मानवता कळत होती,
शेजारधर्म पाळत होते .
कुणी ना कुणाचा शत्रू ,
सगळेच जिवलग मित्र होते.

भेसळ अन्नाची होत नव्हती
रसायनांचा मारा नव्हता .
आता हे सगळे स्वप्न झाले ,
आठवांचा पूर नुसता .

होऊन जागे करु जागे ,
नवसंकल्पाची कास धरु.
जुने ते सोने संकल्पना ,
जनमानसात जोमाने पेरु.

   कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर .

No comments:

Post a Comment