विषय- ऊन सावलीचा खेळ
ऊन सावलीचा खेळ चाले
जणू सुख दुःखाचा भरला मेळा
रोजचाच उगवला सुर्य धरेवर
भासतो तप्त लालसर गोळा
प्राची वरती पसरली लालिमा
पाहू जाता फुलला मननोर
नाचू लागे थुईथुई आनंदे
आपसूकच भासे चितचोर
कोंब डोकावे धरणीआडून
उर्जा भास्कराची अंगी लेवून
कोमल कोमल पर्ण पोपटी
बाहेर येते हळूच वाकून
किरणे सोनेरी पिवळी छान
मोहवे सर्वां सुंदर कमान
लाही लाही होते अंगाची
मध्यांतरीचे उग्र रुप भयाण
ऊन सावलीचा खेळ पाहता
गुढ उकलण्या सारी दंग
सुर्यनारायणाच्या अलौकिक
दर्शनाने सारे झाले गुंग
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर
९८८१८६२५३०
No comments:
Post a Comment