कविता
बद्दीउजमा खावर
मी तर प्रसिद्धी परान्मुख ,
शायर बद्दीउजमा खावर.
साहित्य सेवेत आयुष्यभर,
कुडीत जीव असे तोवर.
मनातल्या भावनांचा खेळ,
मांडला मी शब्द लालित्यातून
कल्पनेचा कुंचला प्रकटला,
शब्दालंकाराचे लेणे लेवून.
प्रसवून विचारांचे मोती,
गुंफला मनोभावनांचा हार.
सुवासिक अर्थाचा परीमळ,
झुलवे मना असा अलवार.
नश्वर जरी मी जीवंत राहीन,
लेखन माझे ठरे अजरामर.
वंदन रसिका प्रेमभावे,
ठेवा चिरंतन राहे सदैव अमर.
No comments:
Post a Comment