उपक्रम
सहाक्षरी
विषय- मंदिर
पावन मंदिर
देऊळ देवाचे
प्रसन्न मनाने
दर्शन घ्यायचे
संतोष मनाचा
येथेच मिळावा
चित्ती समाधान
मोद गवसावा
संकट समयी
भाविक धावती
मनीच्या भावना
देवास सांगती
भावे नक्षीकाम
आरास रंगाची
पणती ज्योतींचे
वेगळ्या ढंगाची
रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment