Saturday, 30 November 2019

कविता ( कधी सांजवेळी )

स्पर्धेसाठी

कविता

कधी सांजवेळी

बांध भावनांचा झाला
कधी सांजवेळी रीता
शांत जीव झाला माझा
ओठी स्फुरली कविता

मानसिक तणावांचे
नको आता ओझे माथी
नाहीतर जीवनात
येते अशांतीच हाती

सांजवेळ आयुष्याची
समाधानी असणार
संगतीने संगीताच्या
नेहमीच फुलणार

नाही आभाळ दु:खाचे
नाही मनात निराशा
बिज अंकुरते असे
जगी दिसे फक्त आशा

सायंकाळी जागवल्या
संवेदना मानवाच्या
हित पाहता स्वतःचे
बंद भिंती भावनांच्या

उघडून नयनांची
दारे खुशाल पाहता
दिसे परदु:ख खरे
शोधू त्यांचा आता त्राता

कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

कविता (स्वप्नपरी )

स्पर्धेसाठी

   स्वप्नपरी

स्वप्नपरी गं स्वप्नपरी ,
आहेस का बरी बाई
येतेस का तू माझ्याबरोबर
माझ्या घरी खेळायला,
मनसोक्त बागडायला.

पांढरे शुभ्र पंख तुझे, 
ऊडत येतेस भरभर. 
शोधतो आम्ही सगळीकडे
तूला घरभर अन् बाहेरसुद्धा.
नको अशी तू लपून बसू.

जादूची छडी हातात शोभते. 
कशी काय बाई जादू करते ?पायात बूट, तूझ्या चंदेरी
दिसतेस मला,खूपच भारी
कपडे तुझे छान जरतारी.

ईवले ईवले, तूझे डोळे छान. 
हळूच कलवतेस,ईवली मान.
हसरा चेहरा, पाहून स्वप्नपरीचा,
आनंद वाटतो बालचमूला, 
अनुभव छान खेळण्याचा.

गोड गोड,गुलाबी रंगाची
निळसर सुंदर डोळ्यांची.
नाजूक नाजूक शरीर सारे
नाक,ओठ ईवले ईवले
सगळ्यांनाच खूप आवडले.

कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 29 November 2019

चित्रकाव्य (झोप )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

झोप

मिळेल का ही असली गादी,
ऊब मायेची सहज देणारी.
श्वानावरती निवांत पहुडली,
निवांत मनीमाऊ काळीपांढरी

श्वान तपकिरी गेले झोपून,
विसरून साऱ्या वैरभावना.
करुन मुटकुळी शरीराची,
नाही मनी कसल्याच यातना.

सख्य म्हणू का म्हणू मैत्री,
दुर्मिळच झाले दृश्य असले.
विश्वास अन् प्रेमासाठी पहा,
मानव जगातील आसुसले.

गाढ झोपली मनीमाऊ,
देते मित्रत्वाचा असा नारा.
श्वानाचा चेहरा पाहून,
वाटते आता थांबावे का जरा? 

पालापाचोळा सर्वत्र पसरला,
चरतो घोडा पहा दूरवर.
नाही कल्पना याची कोणा,
दिसेनाच कोठे तरुवर.

प्रेम राहुदे असेच अभंग,
जातियवादी दुनियेत.
संवेदनशील बनावी सारी,
राहू देत माणुसकीच्या छायेत.

कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 24 November 2019

चारोळी ( रेशीमगाठ )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय- रेशीमगाठ

रेशीमगाठ जीवनातील काल
विवाहबंधनात अशी बांधली
परिपूर्णतेची भावना आपसूक
मुखावर अलवार विसावली

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( झुणका भाकरी )

उपक्रम

चारोळी

झुणका भाकर

खाऊन झुणका भाकर
ढेकर येते तृप्तीची खास
उद्याच्या खाण्याची लागते
मग गरीबाच्या पोटाला आस

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 23 November 2019

ओवी (सय माहेराची )

स्पर्धेसाठी

ओवी रचना

विषय- सय माहेराची

सय माझ्या माहेराची ।
आहे खूपच मोलाची ।।
जाण ठेवते नात्यांची ।
देते भेट प्रेमाची ।।१ ।।

माय नांदे संसारात ।
बाबा व्यस्त हो कामात ।।
भांवडाच्या भावनात ।
गुंग आहे घरात ।।२ ।।

प्रेमभाव मनी असे ।
मानवता अंगी वसे ।।
सर्वत्रच हास्य दिसे ।
जणू गोकुळ हसे ।। ३ ।।

सय येता माहेराची ।
घालमेल जीवनाची ।।
आस दिसे नयनांची।
धार लागे आसवांची ।।४ ।।

माझ्या अंगणी तुळस । 
डुले आनंदी पळस ।।
मोद आनंदी कळस ।
नाही कुठेच आळस ।। ५ ।।

पहा बाबांचा दरारा  ।
सदा डोळ्यांचा पहारा ।।
पण वाटतो सहारा ।
जरी वाटे कापरा ।। ६ ।।

घर माझ्या माहेराचे । 
आहे खूपच मोलाचे ।।
नाही दुसरे तोलाचे ।।
स्थान त्याला मानाचे ।।७ ।।

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Wednesday, 20 November 2019

दुहेरी चारोळी ( साहित्याचे वारकरी )

स्पर्धेसाठी

दुहेरी चारोळी

विषय- साहित्याचे वारकरी

फोडून बांध भावनांचे
चालले साहित्याचे वारकरी
पेरीत बीज शब्दफुलांचे 
कविमनाच्या आज उरी

सारस्वतांच्या मेळ्यामध्ये
संवेदनांच्या चिपळ्या वाजती
मुखी स्तवन कल्लोळांचे
लेखणीतून भाव झरती

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530