षटकोळी
स्वातंत्र्य दिनाची तयारी
रक्त सांडले शूरवीरांनी
भारत भूमीच्या रक्षणासाठी
म्हणूनच आम्ही करतो
स्वातंत्र्य दिनाची तयारी
गणवेशात जायचे प्रभातफेरीला
अभिमानाने सांगत फिरतो.
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
षटकोळी
स्वातंत्र्य दिनाची तयारी
रक्त सांडले शूरवीरांनी
भारत भूमीच्या रक्षणासाठी
म्हणूनच आम्ही करतो
स्वातंत्र्य दिनाची तयारी
गणवेशात जायचे प्रभातफेरीला
अभिमानाने सांगत फिरतो.
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
षटकोळी
आत्मपरिक्षण
जीवन जगत असताना
सुख आणि दु:ख
यश अपयश येतातच
आत्मपरीक्षण एकच उपाय
मार्ग यातून काढण्याचा
संकटे बाजूला जातातच
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
शैक्षणिक चारोळी
रोज एक फतवा निघतो
शिक्षक कामात झाला व्यस्त
अध्यापनाला वेळच नाही
अशैक्षणिक कामाने त्रस्त
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
दर्पण काव्य
विषय -- ओम
ओम
जप शंकराचा
ओम
उच्चार योग आणि प्राणायामाचा
ओम
शरीरशुद्धी साठी श्वासावर नियंत्रण ठेवत उच्चारण्याचा
ओम
भगवान शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी भक्तीभावाने, मनाने सतत म्हणण्याचा
ओम
ऋषीमुनींनी सर्व जगाला दिलेला शांतीच्या या महान मंत्राने मन:शांती मिळवण्याचा
ओम
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
चाचणी स्पर्धा
विषय - आठवण
आठवांच्या झुल्यावर झुलताना
सुख दु:खाच्या फेऱ्यातून
हिंदोळे घेतात विचार
मनातील भावना एकवटतात
व्यक्त होण्यास तडफडतात
आपसूकच बदलतात आचार
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड.
दर्पण काव्य
श्रावण
श्रावण
सुरु झाला
श्रावण
असा रिमझिम तो बरसला
श्रावण
कधी ऊनात कधी पावसात असा पडला
श्रावण
निसर्ग सारा फुलांनी, फळांनी ,हिरव्या वेलींनी,पानांनी फुलला
श्रावण
व्रतवैकल्ये,सणांनी सजलेला,गोडधोड पदार्थ लोकांना खाऊ घालून तृप्त केलेला
श्रावण
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
स्पर्धेसाठी
काव्यांजली
हे बंध रेशमाचे
घालती भुरळ
हे बंध रेशमाचे
माझ्या मनीचे
मजला
बंध रेशमाचे
आहेत मनात माझ्या
जीवनी तुझ्या
येतील
बंध रेशमाचे
राहोत सर्वांच्या जीवनी
सुखी अवनी
होईल
बंध रेशमाचे
प्रेरणा नेहमी देती
आनंदाने गाती
सकलजन
बंध रेशमाचे
असेच अलवार बहरता
अशांततेत शांतता
येईल
बंध रेशमाचे
फुलतील तुमच्या जीवनी
रहा आनंदानी
नेहमीच
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर