Saturday, 2 September 2017

पवित्र बंधन

स्पर्धेसाठी

    पवित्र बंधन

नात्यांचे हे पवित्र बंधन
असेच असते जपायचे
माणुसकीच्या नात्याने
अलवार असते फुलवायचे.

      रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर

पाणी

स्पर्धेसाठी

           हायकू

           पाणी

पाणीच पाणी
मुंबापुरीत पहा
कल्लोळ पहा

धावले सर्व
लगेच मदतीला
एकमेकाला

एकजुटीचे
चित्र पाहुन मनी
ते समाधानी

अशीच राहो
ही सहकार्य वृत्ती
मोदचित्ती

भारतमाता
हो खाण संस्काराची
स्विकारायची.

    रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर

निवांत तळ्याच्या काठी

उपक्रम

चारोळी

निवांत तळ्याच्याकाठी
बसून ती न्याहाळत होती
निसर्गदृश्य अतीसुंदर
मनी सौंदर्य साठवत होती.

   श्रीमती माणिक नागावे
        कुरुंदवाड

Friday, 1 September 2017

पावसा

स्पर्धेसाठी -- गझल

         वृत्त -- ताडित

लगावली  ः  गालगा

             पावसा

पावसा
भास तू

आमचा
श्वास तू

धरती
पूत्र तू

पडरे
खूप तू

आजची
आस तू.

पावशा
मित्र

  रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर

मुंबईचा पाऊस

स्पर्धेसाठी

विषय -- मुंबईचा पाऊस

जागवल्या स्मृती ,
पुन्हा एकदा प्रलयाच्या.
पाहून रौद्ररुपातील ,
मुंबापुरीतील पावसाच्या.

जलमय झाली मुंबई ,
जशी सर्वत्र आणीबाणी .
खोटा ठरला अंदाज ,
नाही साचणार पाणी .

वाहतुक झाली ठप्प ,
रस्ते पाण्याखाली गेले.
पाण्यातच सारी जनता ,
जणू अस्मानी संकटच आले

नोंद विक्रमी पावसाची ,
वाढली धडधड हृदयाची.
बंद शाळा , बंद अॉफीस ,
लगबग घरी जाण्याची .

निचरा पाण्याचा व्हावा ,
खर्च झाला यासाठी खूप.
गेला सारा पैसा पाण्यात,
हा सर्वांच्या डोक्याला ताप.

      कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ
जि. कोल्हापूर.

स्वयंवाचन

स्पर्धेसाठी

       चित्रकाव्य स्पर्धा

   
        स्वयंवाचन

एकदा मी माझं मलाच ,
तटस्थपणे वाचायच ठरवलं.
मेंदूतील विचारपुस्तकाला ,
मन माझं वाचायला लागलं

म्हणालं शिकली पुस्तके ,
आजवर ज्ञानार्जनासाठी .
गरज आहे आजमितीला ,
स्वयंवाचन व्यक्तीमत्वासाठी

मी कोण ? काय आहे ?
उत्तर स्वताःहून शोधायचयं.
नकारात्मकता असेल काही
अलगद बाजूला सारायचयं.

सकारात्मकतेचे पुस्तक ,
अंगीकारुन पुढेच जाऊया.
मनातल्या वाईट भावनांना,
वाट मोकळी करुन देऊया.

भान असुद्या समाजाचे ,
ज्याचे तुम्ही घटक आहात.
वाचा स्वताःच स्वताःला ,
जबाबदार आपणच आहात.

        कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

Thursday, 31 August 2017

इंद्रधनु व क्षितिज

स्पर्धेसाठी

        शब्दचारोळी

     इंद्रधनु व क्षितिज

ऊनपावसाचा खेळ सुंदर
नभांगणी अतीमोहक चाले
पहा इंद्रधनु हे प्रकटले
क्षितिजावर सप्तरंगी डोले.

        रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर