Wednesday, 16 October 2019

चारोळी ( फुलपाखरू )

चारोळी

फुलपाखरू

काळ्यापांढऱ्या नक्षीचे
फुलपाखरू तपकिरी रंगाचे
विहरते पंख पसरुन तरुवर
दृश्य विहंगम हिरवाईचे

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

बालकविता ( पुस्तक )

स्पर्धेसाठी

बालकविता

विषय -पुस्तक

आई मला हवे छान पुस्तक,
सुंदर पानांचे रंगीत रंगीत.
पहायचे आहे मला चित्रे ,
समजून घ्यायचे आहे संगीत.

छोटेसेच पण जाड पानांचे,
ज्यात असतील सुंदर पाने.
पानापानातून पहायचे आहे,
जीवनाचे आनंदी गाणे.

प्राणी, पक्षी,झाडे वेली,
नदी,नाले,कोसळणारे पाणी.
सजलेली धरणीमाता अन्,
नटलेली ती निसर्गराणी.

चित्राबरोबर मिळवायचे आहे,
सर्व जगातील सर्व ज्ञान.
शिकून, वाचून होईन मोठी,
मिळवीन मी जगी मान.

पुस्तक माझे आहेत मित्र,
बरे वाईट सांगतात मला.
काय चांगले काय वाईट,
सांगून देतात ज्ञान सर्वाला.

पुस्तक मला प्रिय भारी,
करमत नाही त्यांच्याशिवाय.
नाही झोपत कधीही मी,
पुस्तकांना वाचल्याशिवाय.

कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( आई तू नसताना )

चारोळी

आई तू नसताना

जग सारे सुने आहे मला
आई तू नसताना जीवनात
नेहमीच तू वसली आहेस
माझ्या हृदयाच्या कोंदनात

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 13 October 2019

परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्यातील ताणतणाव

चर्चेसाठी मुद्दे

*१)परीक्षाकाळातील विद्यार्थ्यांच्या मुख्य समस्या कोणत्या?*

परीक्षाकाळातील विद्यार्थ्यांची मुख्य समस्या असते ती म्हणजे परीक्षेचे घेतलेले टेन्शन होय.

*२)विद्यार्थ्यांची ताणतणावाची कारणे कोणती?*

तणावाची कारणे

1) सुरवातीपासून अभ्यासाकडे केलेले दुर्लक्ष
2) वर्गामध्ये शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्ष न देता टिवल्याबावल्या करत बसणे.
3) शिकवलेल्या भागाची उजळणी न करणे.
4) अभ्यासात सातत्य न ठेवणे.
5) परीक्षेची अकारण घेतलेली धास्ती
6) लिखाणाचा सराव नसणे

*३)पालक नात्याने आपण विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन करू शकता?*

पालक या नात्याने मी स्वतः त्यांना अभ्यासाला घेऊन बसेन.त्यांना वेळ देईन. त्यांच्या शंकांचे निरसन करेन.योग्य ठिकाणी मार्गदर्शन करेन.परीक्षा म्हणजे काहीतरी भयंकर आहे ही त्यांच्या मनातील भावना काढून टाकण्याचा प्रयत्न करेन.

*४)परीक्षेपूर्वी पालकांची जबाबदारी कोणती असावी?*

सतत मुलांच्या सोबत राहून त्यांना तणाव न देता त्यांचे मनोबल वाढवणे,आधाराचे शब्द ऐकवणे.महत्त्वाचे म्हणजे आपल्या अपेक्षा न लादणे.आरोग्याची काळजी घेणे.सकस आहार देणे
ही सर्व काळजी घेणे पालकांची जबाबदारी आहे.

*५)विद्यार्थ्यांनी परीक्षा काळात कोणत्या गोष्टी कराव्यात/कोणत्या गोष्टी टाळाव्यात?*

विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात तणावरहित असले पाहिजे.योग्य पद्धतीने अभ्यास करावा.योग्य व सकस आहार घ्यावा. तब्येतीची काळजी घ्यावी. या गोष्टी कराव्यात
तर दुसऱ्या बरोबर आपली तुलना करु नये.खूप जागरण करु नये.बाहेरचे पदार्थ व तेलकट, तुपकट ,स्वास्थ्य बिघडवणारे पदार्थ खाऊ नयेत.अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये.व सर्व मला पाठ झालेच पाहिजे असा आग्रह धरु नये.या गोष्टी टाळाव्यात

*६)सुजाण पालक म्हणून विद्यार्थ्याप्रति आपली जबाबदारी काय असावी?*

सुजाण पालक म्हणून आपली भूमिका अशी असावी की सुरवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. शिक्षकांना वरचेवर भेट देऊन पाल्याची चौकशी, अभ्यासासंबधी चौकशी करणे.वेळच्यावेळी पाल्यात सुधारणा करवून घेणे. आपल्या अपेक्षा त्यांच्यावर न लादता त्यांच्या बुद्धीची झेप,आवाका पाहून त्यांना त्यांच्या कलाने जाऊ देणे.

*७)परीक्षा काळातील ताण तणाव कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय खबरदारी घ्यावी?*

परीक्षाकाळातील ताणतणाव कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी योगासने , प्राणायाम व ओंकारासारखे व्यायाम करावेत.मन शांत ठेवून अभ्यास करावा.आरोग्याची काळजी घ्यावी.

*८)विद्यार्थ्यांच्या ताणतणावासाठी पालकांनी कशी खबरदारी घ्यावी?*

विद्यार्थ्यांचा ताणतणाव घालवण्यासाठी पालकांनी स्वत:चे आचरण सुधारले पाहिजे. घरात शांतता ठेवली पाहिजे. घरात कोणत्याही प्रकारचा कलह करता कामा नये.पाल्याजवळ बसून धीर द्यावा,चांगली उदाहरणे द्यावीत

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 12 October 2019

चारोळी ( औक्षवंत हो )

स्पर्धेसाठी

चारोळी

औक्षवंत हो

आयुष्य चढउतारामध्ये बाळा
यशाची कमान उंचच राहू दे
औक्षवंत हो निरोगी जीवनात
आशिर्वचनाने बळ तुला मिळू दे

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( मायलेकरांची प्रीत आगळी ).

स्पर्धेसाठी

चारोळी

मायलेकरांची प्रीत आगळी

मायलेकरांची प्रीत आगळी
रीतच जगी याची वेगळी
मानव असो वा असो प्राणी
प्रेमाखातर होती वेडी सगळी

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 11 October 2019

चारोळी ( तुला विसरणे जमलेच नाही )

उपक्रम

चारोळी

तुला विसरणे जमलेच नाही

माझा प्राण तू माझा श्वास तू
तुला विसरणे जमलेच नाही
गुलाबापरी कोमलांगी सखे
न सांगायचे मला दुसरे काही

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर