Tuesday, 8 October 2019

बालकविता ( लेक )

काव्यप्रेमी शिक्षक मंच औरंगाबाद आयोजित बालसाहित्य स्पर्धा क्र.- 3 साठी

कविता

विषय- लेक

लेक लाडकी

लेक लाडकी लाडाची,
आईबाबांची मी बाहुली.
आनंद समाधान घेऊनच,
जीवनी त्यांच्या कळी फुलली

बोबडे बोल ऐकून माझे,
भान हरपून सगळे जाती.
पाहून माझ्या बाललीला,
सगळेच भोवती जमती.

जवळ आजीआजोबांच्या,
नेहमीच गोष्टींचा खजिना.
त्याच्याशिवाय कधीही,
जीव माझा अजिबात राहिना.

दादा,ताई खूपच प्रेमळ,
फीरायला मला नेती.
आईस्क्रीम,चॉकलेट,बिस्किटे,
भरपूर मला खायला देती.

अशी लेक सर्वांचा अभिमान,
जपायला हवी तिला सर्वांनी.
नको मारायला गर्भातच,
घेऊ द्या भरारी उंच गगनी.

कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( सीमोल्लंघन )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय - सीमोल्लंघन

दसऱ्याच्या शुभदिनी करुया
सीमोल्लंघन नव्या जीवनी
कषायरुपी दुर्गुणांना संपवून
मिळवू समाधान मनोमनी

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू ( दसरा )

स्पर्धेसाठी

हायकू

विषय- दसरा

विजयोत्सव
करु आज साजरा
आज आहे दसरा

करुन मात
अन्यायावर खरी
न्यायाची फेरी

जाळू रावण
प्रतिक कुप्रथांचा
जय सत्याचा

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 6 October 2019

चारोळी ( दांडीया )

चारोळी

दांडीया

लालकाळ्या पोशाखावरील गोंडे
मोहवती बाल चेहऱ्याला
टिपऱ्या रंगीत घेऊन हाती
बालिका निघाली दांडीयाला

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 4 October 2019

चारोळी ( जागर स्त्री शक्तीचा )

स्पर्धेसाठी

जागर स्त्री-शक्तीचा

करु जागर स्त्री- शक्तीचा
जागृत करुन विवेकबुद्धीला
देऊ उत्तर स्वकर्तुत्वाने सर्वा
सुरक्षित ठेवून स्त्रीत्वाला

निर्भयपणे वावरण्यासाठी
बिंबवू संस्कार मानवतेचे
जाणून घेऊ स्त्री- शक्तीला
स्वप्न आहे भारतमातेचे

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 2 October 2019

कविता ( वारे निवडणूकीचे )

स्पर्धेसाठी

कविता

वारे निवडणूकीचे

वाहू लागले वारे निवडणूकीचे
पडघम चोहिकडे ऐकू आले
घराघरातील आबालवृद्धांना
सर्वजण मान देऊ लागले.

लावण्या वर्णी स्वतःची गोटात
जो तो चपला झिजवू लागला
मीच कीती योग्य उमेदवार
पटवण्यासाठी पुढे आला

कधीच दिसले नाही शेजारी
आता रोजच राबता सुरु झाला
पदरच्या पैशातून प्रत्येकाला
खूष ,समाधानी ठेवू लागला

दादा, आक्का, मामा अन् मामी
सगळेच आपले लागले वाटू
सोडून सगळी लाज शरम
सत्तेसाठी पाय लागले चाटू

कोण आपला कोण परका
ओळखण्याची नामी संधी
आहे एक सर्वांसाठी युक्ती
उतरवण्यास मस्तीची धुंदी

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 1 October 2019

चित्रकाव्य ( देवाच्या दरबारात )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

देवाच्या दरबारात

देवाच्या दरबारात घेतली,
क्षणभराची ही विश्रांती.
सारुन सारे दु:ख बाजूला,
मिळवली मनाची शांती.

आयुष्याच्या जोडीदारावर,
आहे भरवसा मनापासून.
पतीराजांच्या मांडीसारखी,
ऊशी नाही मिळणार शोधून.

भंडाऱ्यानेच पिवळी झाली,
साडीचोळी अन् धोतरजोडी.
धरतीवरही सडा पडला,
शोभून दिसली देवाची माडी.

भक्त फिरती भक्तीभावाने,
विसरून प्रपंचाचा विचार.
सोडून सारे दुराचारी वागणे,
ठेवती मनी शुद्ध आचार.

अशीच जोडी पतीपत्नीची,
देवा,सर्वांचीच राहू दे.
नको भांडण,नको तंटा,
सारी माणूसकीने वागू दे.

कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,ता.शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर