Sunday, 7 May 2017

मेहंदी

स्पर्धेसाठी

            मेहंदी

मेहंदीचा दरवळ सुखावतो
भुरळ पाडतो माझ्या मनाला
नक्षी कोरीव अतिसुंदर छान
कलाकारी देते आनंद जीवाला

✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

टोपीतलं सौंदर्य

🙏🏻स्पर्धेसाठी 🙏

    चित्रावरुन कविता

    👩🏻‍✈  टोपीतलं सौंदर्य  👩🏻‍✈

  कौतुक तुझ पोरी ,
माझ्याशिवाय कोण करणार ?
  भविष्यातील अधिकारी ,
  तुझ्यातच मी पाहणार .

  फाटक्या माझ्या संसारात ,
  दिप आहेस तुच आशेचा .
  हास्य तुझ्या वदनावरचे ,
  साक्षिदार आपल्या प्रीतीचा .

  विसरुन गेले दुःख माझ ,
  साज-या या तुझ्या रुपानं .
  टोपीमधल सौंदर्य तुझ ,
  असच राख तू बेतानं .

  हातात तांब्या तसाच राहीला ,
  विसरुन गेले तोंड धुणे .
  नको देवा नशिबी पोरीच्या ,
  देऊ आमच्यासारखे जिणे .

  गोड निरागस रुप लेकीचं ,
  डोळ्यात भविष्याची झाक .
  ऐकशील ना नक्की बाई ,
  वेड्या आईची ही हाक .

✍✍ कवियीत्री ✍✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .416106

चारोळी

स्पर्धेसाठी

चित्रावरुन चारोळी

शांत निवांत समयी
उसवते मी चोळी तंग
माजघरातील निरव शांततेत
स्वप्नातच माझ्या आहे मी दंग

✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

संस्कार

आजचा उपक्रम

झटपट प्रश्नांची ऊत्तरे

विषय -- संस्कार

    संस्कार म्हटलं की आपल्या  डोळ्यासमोर येते ते म्हणजे संस्कारमोतींनी भरलेले ,महान स्त्रोत असलेले संस्काराचा महामेरु  " शामची आई " हे परमपूज्य साने गुरुजींनी लिहलेले महन्मंगल पुस्तक होय .
   आजच्या धावपळीच्या युगात विद्यार्थ्यांच्या बरोबर पालकांचीही ससेहोलपट व धावपळ होत आहे .यामध्ये मुलांचे बालपण हरवत चाललय .त्यामध्ये संस्काराला कुठे जागा दिसत नाही .
    संस्कार म्हणजे तर नेमके काय आहे ?गुणांचा गुणाकार करुन दोषांचा भागाकार करणे होय .पुर्वी गुरुकुल पद्धती मुळे शिष्यांना सर्व ज्ञान प्रत्यक्ष  मिळत असे .ज्याचा उपयोग  त्यांना त्यांच्या भावी आयुष्यात  उपयोगी पडायचे .पण आज एकदोन लाडकी मुले , आजी-आजोबांची हकालपट्टी या कारणांमुळे संस्कार शिकवायची गोष्ट होऊन गेली आहे.संस्कारवर्ग ऊघडली गेली आहेत.
   पण संस्कार हे कधीही शिकवायला लागत नसतात .ते आपोआपच घडत आसतात .मुले ही अनुकरणप्रिय असतात .त्यांना संस्कार आपल्या वागण्यातून द्यायचे असतात .आपण कसे वागतो तसे ते वागत असतात .याचे भान मोठ्यांनी व पालकांनी ,शिक्षकांनीही लक्षात ठेवले पाहीजे .संस्कार कधीही विकत घेता येत नाहीत .
   त्यामुळे स्वयंशिस्त श्रमप्रतिष्ठा , स्वावलंबन याकडे लक्ष द्या व तसे वागा .तुमच्याकडे बघुन कुणीतरी वागतय ,आचरणात आणतय , याचे भान ठेवा.

✍✍ विचार ✍✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106

जीवनगाणे

स्पर्धेसाठी

आठोळी स्पर्धा

विषय -- जीवनगाणे

जीवनगाणे देते स्फूर्ती
गतकाळाच्या उंबरठ्यावर
नको निराशा नको दुःख
हसत झुलावे सुखहिंदोळ्यावर

जन्ममृत्यूच्या फे-यामध्ये
फुलु द्या आनंदाचा झरा
कर्मबंधाच्या वळचणीवर
आनंद शोधतो खरा

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

✍✍ रचनाकार ✍✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि .कोल्हापूर , 416106

गोंडस परी

स्पर्धेसाठी

            चारोळी

   विषय -- गोंडस परी

गोंडस परी ही सृष्टीची
जीवनाला खरा अर्थ देणारी
लोभस अस्तीत्वाने आपल्या
घराचे नंदनवन करणारी

✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ  ,
जि. कोल्हापूर , 416106

अशी ही सृष्टी

स्पर्धेसाठी

     निरजा प्रकार

    अशी ही सृष्टी

    गोड लोभस सृष्टी
    प्रेमळ स्वभावाची
      वाढदिवसाच्या
     आभिष्टचिंतनाची
    शुभेच्छांची सतत
   अशीच व्हावी वृष्टी

✍✍ रचना✍✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106