Sunday, 26 March 2017

स्पर्धेसाठी

               हायकू

   🏕     निसर्ग  नाते  🏕


        निसर्ग राजा
      सुखावतो मजला
         खुप भावला

        गर्द झाडीची
      आस मज लागली
        वृक्ष लावली

          छायेत त्यांच्या
       मिळेल समाधान
          ते आवधान

         वृक्ष लावले
        जागा असेल तिथे
          शांतता ईथे

          ऊन्हाळा आला
        सावली त्या झाडांची
           तृप्त मनाची

           निसर्ग नाते
         टिकवायलाच हवे
            भरुन पावे

    ✍✍✍✍✍

   श्रीमती माणिक क.नागावे
 कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
 जि. कोल्हापूर , 416106
📚 हायकू 📚

   सार वर्षाचा
  लिहतात सगळे
  झाले घोटाळे


    आली परीक्षा
   अभ्यासात गुंतले
     स्वप्न भंगले

   लक्ष वर्गात
   हवे होते द्यायला
    हे कळायला

    देईन लक्ष
    आता खरोखरीच
     यश नक्कीच

    जरी कळले
    शहाणपण मला
     निर्धार केला

      ऐका मुलांनो
      सदा पाठपुरावा
       अंगी बाणवा



 श्रीमती माणिक क.नागावे
 कुरुंदवाड , ता.शिरोळ
 जि. कोल्हापूर , 416106

आजीआजोबा

मलाही हवेत आजी आजोबा


आजी आजोबा हे सगळ्यांच्या घरी आसलेच पाहीजेत अस माझ मत आहे .कारण आजी आजोबा ज्या घरात असतात ते घर कुलुप न लावता सुरक्षित असत.घराला घरपण येत .घरामध्ये सर्वांना जोडणारा ते एक दुवा असतात .मला आजोबांच सुख मिळाल नसल तरी आजी माझ्याबरोबर खुप वर्षे होती .

सर्वात महत्वाचे म्हणजे आजी आजोबा ही दोघे संस्कारमोती देणारी मंदिरे असतात. आजच्या धावपळीच्या युगात आईबाबांना मुलांकडे द्यायला वेळ नाही .अशावेळी घरी आजीआजोबा असतील तर आपण आपल्या मुलांबद्दल ,त्यांच्या संस्काराबद्दल ,घराबद्दल,घराच्या सुरक्षिततेबद्दल अगदी निर्धास्त राहू शकतो.

आजीआजोबा घरी असलेच पाहीजेत.त्या दोघांना मुले वाटुन घेतात.हेही चुकीचे आहे.त्यांना एकत्रच राहुद्या .आपला भविष्यकाळ सुखाचा जायचा असेल या दोन संस्कारदेवतांना जवळ ठेवा .


श्रीमती माणिक क.नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.- कोल्हापूर , 416106

Tuesday, 28 February 2017

माझा आवडता कवी

मराठी राजभाषानिमीत्त  
    काव्यलेखन
माझा आवडता कवि

         कुसुमाग्रज

दिन आजचा सुदिन जाहला,
कुसुमाग्रज ते जन्मा आले .
ज्ञानपंढरी धन्य जाहली ,
सकल जन हे कृतार्थ झाले .

प्रभुत्व तयांचे मराठीवरती ,
सांगे काव्यसंग्रह 'विशाखा'.
आस वाचकांची पुर्ण करण्या ,
ऊघडल्या ग्रंथालयाच्या शाखा.

अजरामर झाली ती रचना,
'ययाती' अन्  'देवयानी .
मानवतेचा कळवळा प्रकटे ,
नाजुक त्या भावनांनी .

'नटसम्राट' तो खरा जाहला ,
मानवस्वभाव तो प्रगटला .
'ज्ञानपिठ' सन्मान मिळाला ,
वंदन त्या र्रूषितूल्य जिवाला .


श्रीमती माणिक क.नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापुर ,416106
9881862530

Monday, 27 February 2017

माझी नजर

प्रेमकविता

         माझी नजर

पाहता तुला झुकते,खालीमाझीनजर .
पण राहतोस तू असा,
सदैव डोळ्यासमोर .

मनात तुझे प्रतिबिंब ,
डोळे माझे ओलेचिंब .
सदैव शोधते ,माझी ही नजर,
राहतोस तू सदैव डोळ्यासमोर.

बेचैन मनाची तू शांती ,
प्रेरणेची घडवी तू क्रांती .
पाहती तू कुठे कसा माझी नजर ,
पण राहतोस  तू सदैव डोळ्यासमोर .

प्रेम माझे तुजवरी ,
दाटले ते माझ्या ऊरी .
व्यक्त करण्या तडफडते माझी नजर ,
राहतोस तू सदैव डोळ्यासमोर



श्रीमती माणिक क.नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर . 416106
 9881862530

माय मराठी

*--------------------------*
*२७ फेब्रुवारी*

*कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या व*
*मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!*
*--------------------------*


      📚  माय मराठी 📚

  माय मराठी माझी माता ,
  नाही ऊणे कुठे सापडणार.
  गर्व असणार नेहमीच ,
  मान अभिमानाने उंचावणार.

  वळवावे तशी वळते ही ,
  अर्थ घेऊ समजाऊन .
  गरज आहे त्यासाठी ,
  ऐकायची ती मन लावून .

  माता जशी समजून घेते ,
  पोटच्या लेकराला .
  वाट करुन देते ही ,
  मनातील भावनेला .

  बाज हिचा असे वेगळा ,
  सानथोरांची ही भाषा .
  नसे वाटे ही परकी ,
  आहे सर्वांचीच आशा .


   ✍ श्रीमती माणिक नागावे
 कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
 जि.कोल्हापूर .416106.
  9881862530.

👑👑👑👑👑👑👑

Tuesday, 13 September 2016

कवितासंग्रह

श्रीमती माणिक नागावे यांचा मराठी कवितासंग्रह 'भावतरंग' आता फ्लिप बुक स्वरुपात इंटरनेटवर उपलब्ध झाला आहे.... सदर पुस्तक इंटरनेटवर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे... http://fliphtml5.com/fkws/jiwr