हाक
हाक मानवतेची येता ऐकू
एकवटल्या साऱ्या भावभावना
विसरून सारे भेदभाव मनातले
गाडला गेला जातियवाद
सहकार्यवृत्ती वाढीस लागली
दिसू लागली फक्त संवेदनशीलता
शब्द धीराचे कानी येता
आपलेपणाचा ओलावा दिसला.
हाक येता संकटकाळी
तेंव्हाच का आपण जागे होतो?
संकटे येतात शिकवायला
माणसातला माणूस जागा करायला
ओळखून हाक निसर्गाची
कायमपणे वागायला हवे
विसरून सारे हेवेदावे
तरच मनाला शांतता लाभे.
श्रीमती माणिक नागावे
No comments:
Post a Comment