Wednesday, 28 October 2020

कविता (हाक )

हाक

हाक मानवतेची येता ऐकू 
एकवटल्या साऱ्या भावभावना 
विसरून सारे भेदभाव मनातले 
गाडला गेला जातियवाद 
सहकार्यवृत्ती वाढीस लागली
दिसू लागली फक्त संवेदनशीलता 
शब्द धीराचे कानी येता 
आपलेपणाचा ओलावा दिसला.

हाक येता संकटकाळी
तेंव्हाच का आपण जागे होतो?
संकटे येतात शिकवायला 
माणसातला माणूस जागा करायला
ओळखून हाक निसर्गाची 
कायमपणे वागायला हवे 
विसरून सारे हेवेदावे
तरच मनाला शांतता लाभे.

श्रीमती माणिक नागावे

Monday, 26 October 2020

चारोळी(सल्ला )

सल्ला

सल्ला देणं सोपं असतं
सल्ला ऐकणं अवघड जाते
यासाठीच होतात कलह संसारात
सासू-सुनेचे नकळत बिनसते.

श्रीमती माणिक नागावे

Sunday, 18 October 2020

हायकू (बिजांकुर )

हायकू

बीजांकुर

खोल पेरले
बीजांकुर मातीत
जुनीच रीत

घटस्थापना
गव्हांकुर रुजले
देव सजले

हळू डोकावे
पालवी शेंड्यावर
मना आवर 

वाढ होतसे
रोप बीजाचे झाले
छान वाढले

नवजीवन
फळां फुलां मिळाले
चैतन्य आले

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड. जिल्हा. कोल्हापूर

Friday, 16 October 2020

हायकू( भाजीपाला )

हायकू

भाजीपाला

नाना प्रकार
भाजीपाला असती
सर्वच खाती

हिरवा रंग
ताजेतवाने दिसे
मनात वसे

आरोग्यासाठी
जीवनसत्व खूप
पालटे रुप

रानावनात
भरपूर पिकते
आधार देते

सतत घ्यावे
भोजन कसदार
रुबाबदार

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 13 October 2020

चित्रहायकू (सुंदर दृश्य )

चित्रहायकू

सुंदर दृश्य

निसर्ग दृश्य
मोहवते मनाला
क्लांत जीवाला

रंगीबेरंगी
बाग फुलांची फुले
सुहास्य डुले

पांढरा रंग
मध्यवर्ती पिवळा
दिसे मोकळा

लाल वर्णाची
उभट देठावर
तुरे सावर

सोनेरी आभा
नभात पसरली
लालीमा आली

डोंगर माथा
हिरवाई नटली
मना पटली

हिरवे देठ
सांभाळती सुमने
सौंदर्य वने

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 12 October 2020

अष्टाक्षरी (प्रेरणेची ज्योत )

उपक्रम
अष्टाक्षरी
माझी मुलगी गुणांची

शिर्षक- प्रेरणेची ज्योत

कुटुंबात माझी लेक
ज्योत आहे प्रेरणेची
जशी कारंजी हास्याची
माझी मुलगी प्रेमाची

रंग धवल शोभतो
उजळून मुख दिसे
गोलाकार नाकी डोळी
आनंदच मनी वसे

संघर्षाच्या वाटेवर 
धीरोदात्त वावरते
यश आपसूक येते 
कधी नाही कचरते

मोहमयी जगातील
 खोटे चेहरे जाणते
खऱ्यासाठी,न्यायासाठी
लढा निर्धाराने देते

मातृमुखी गौरवर्ण
लेक असे बुद्धिमान
काळजीने सेवा करी
सर्वांचाच स्वाभिमान

अभिमान माझा असे
कौतुकाचा होतो मारा
हळुवार बोलावते 
कुटुंबाचा मान खरा

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 10 October 2020

चारोळी(हिरवाई )

हिरवाई

ओथंबलेले घन स्पर्शती धरती
हिरवाईवर पांघरली गर्द छाया
ओहोळ झेपावती पायथ्याशी 
अशीच आहे निसर्गाची किमया

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी(हिरवाई )

हिरवाई

ओथंबलेले घन स्पर्शती धरती
हिरवाईवर पांघरली गर्द छाया
ओहोळ झेपावती पायथ्याशी 
अशीच आहे निसर्गाची किमया

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 9 October 2020

चारोळी(विषमता )

चारोळी
विषमता

दरी विषमतेची खोलच जाते
उष्टावण्याने पोट भरण्याची धडपड
शौक श्रीमंतीचा एपल फोन 
घट्ट होतीय त्यावरचीच पकड

रचना
श्रीमती माणिक नागावे. कुरुंदवाड

चारोळी (पत्र )

पत्र

गुज मनातले,भाव विचारांचे
प्रकट करते पत्र दोन जीवांचे
बांध भावनांचा नकळतपणे
ओसंडतो,सामर्थ्य लेखणीचे

श्रीमती माणिक नागावे

Thursday, 8 October 2020

चारोळी ( अधिवास )

चित्रचारोळी

घरटे

अधिवास आमचा नष्ट झाला
घरटे बांधण्यास मिळेना वृक्ष
धोकादायक पण वाटे सुरक्षित
असे जीवन पहा झाले रुक्ष

श्रीमती माणिक नागावे

चारोळी ( मोबाईल )

चारोळी

मोबाईल

आलेत दिवस मोबाईलचे हल्ली
ऑनलाइन ऑफलाईनच्या घोळात
नको हाती घेऊ म्हणता म्हणता
अत्यावश्यक बनला मेळात

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( संचित )

चारोळी

संचित

आयुष्यातील कर्मानुसार
ठरते प्रत्येकाचे संचित जीवनी
सचोटीने वागले सर्वानीच तर 
भविष्यातही हसेल अवनी

रचना श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी ( बासुरीवाला )

चित्रचारोळी

बासुरीवाला

बासुरीवाला कृष्ण मुरारी उभा
मोहक अदा वाजवतो मुरली
निश्चल शरीराची ठेवण भारी
मनोभावे राधा स्मरली

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 7 October 2020

हायकू ( कमळ )

चित्रहायकू

कमळ

छान कमळ
पाण्यावर डोलते
मन बोलते

दाट गुलाली
आकर्षक पाकळ्या
दिसे मोकळ्या

ताठ मानेने
उभे अभिमानाने 
शांत चित्ताने

कमल पर्ण
गोलाकार आकार
चित्र साकार

चार सुमने
देवीची आवडती
श्रद्धेने देती

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

बालगीत( ससोबा ससोबा )

उपक्रम

बालगीत लेखन

वर्ण- बारा

विषय-कळीचा ससोबा

शिर्षक- ससोबा ससोबा

ससोबा ससोबा, काय करतोस?
रोजरोज घरी,खेळण्या येतोस? ।। धृ ।।

झुपकेदार ती,शेपूट दिसते
पळताना मात्र,छानच दिसते
बसल्यावरही,तू हलवतोस ? ।।१।।

कळीचा ससोबा, का बरे म्हणती ?
डोळे लालसर, शोभून दिसती
कुणाला पाहून, मिचकावतोस? ।।२ ।।

पांढरा पांढरा, शुभ्र तुझा रंग
लुसलुशीत रे,छान आहे अंग
सारखा सारखा,का घाबरतोस? ।।३ ।।

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर