Thursday, 9 January 2020

हायकू ( थंडी )

स्पर्धेसाठी

हायकू

विषय -- थंडी

पडली थंडी
गारठले सगळे
घातली बंडी

अंगी स्पर्शते
जाणीव गारव्याची
उब स्मरते

सुरु होतसे
पानगळ वृक्षांची 
भकास दिसे 

बसती सारे
पेटवून शेकोटी
गरम व्हारे

आस गोडीची 
स्नेह वाढविण्याची 
धुंद प्रेमाची 

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment