Friday, 24 January 2020

चारोळी ( भारत देश महान )

स्पर्धेसाठी

चारोळी

भारत देश महान

विश्वात घुमला याचा नारा
भारत देश महान आपला 
नजर वाकडी करुन पाहता 
शत्रू असा जो क्षणात संपला

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Thursday, 16 January 2020

चारोळी ( युवा )

स्पर्धेसाठी

चारोळी

युवा

नवस्वप्नांना फुटती धुमारे
युवा आजचा पुढे चालतो
घेऊन अनुभव समोरच्यांचा
आभाळाला गवसनी घालतो 

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 15 January 2020

चारोळी ( भास्करकीरणे )

स्पर्धेसाठी

चित्रचारोळी

जलाशयाच्या काठी उभा मी
भास्करकीरणे लुभावती मना
लक्ष ठेऊनी ध्येयावरती माझे
लक्ष्य साधण्याची मनोकामना

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 9 January 2020

हायकू ( थंडी )

स्पर्धेसाठी

हायकू

विषय -- थंडी

पडली थंडी
गारठले सगळे
घातली बंडी

अंगी स्पर्शते
जाणीव गारव्याची
उब स्मरते

सुरु होतसे
पानगळ वृक्षांची 
भकास दिसे 

बसती सारे
पेटवून शेकोटी
गरम व्हारे

आस गोडीची 
स्नेह वाढविण्याची 
धुंद प्रेमाची 

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (गोधडी )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय -- गोधडी

माया सामावली आजीची
टाक्या टाक्यातून जिव्हाळा 
सजली चिंध्यातून गोधडी 
पांघरता येतो प्रेमाचा उमाळा 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( देशप्रेम )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय-- देशप्रेम

नसानसांत देशप्रेम असते
भिनलेले शूर जवानांच्या
जाण ठेवून त्यांची आपण 
पार करु भिंती धर्मांधतेच्या 

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 2 January 2020

चारोळी ( नववर्ष )



चारोळी

नववर्षाचा संकल्प

गतकाळातील नकोत गोष्टी
भविष्यकाळ हा सजवूया
समजून घेऊ चुका झालेल्या
आनंदी संकल्पाने सारे जगुया

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर