Monday, 8 August 2016

थोड दमानं घे

वाट चातकासारखी पाहीली ,
सा-या अंगाची काहीली झाली.
आलास तू बरसतच असा ,
पळता भुई थोडी व्हावी जसा

पावसा तू असा रे कसा ?
कसा ठेवायचा तुझ्यावर भरवसा ?
नव्हतास तर लागली होती आस,
पाण्यात बुडाल्याचा होतोय आता भास .

बरसलास तू मुसळधार,
थांबेना ती संततधार.
कोरडी नदी पाण्याने भरली
दुथडी भरून वाहू लागली.

शिवाजी पुलाची मच्छिंद्री झाली ,
धोक्याची पातळी ती ओलांडली .
बंद रस्ते, झाली कोंडी वाहतुकीची ,
लगबग झाली मग स्थलांतराची.

थोड तू आता दमानं घे ,
आहेस हवा पण जरा ऊसंत घे.
वागू नको असा वेड्यासारखा
लाऊ नको मोजायला दिवसा तारका.

वृक्ष माझा सखा

झाडे लावा , झाडे जगवा,
घोष हा न्यारा.
वृक्षसंवर्धनाचा घेतला वसा,
तडीस नेईल तोच खरा.

घोषणा सरकारी दरबारची ,
2 कोटी वृक्षलागवडीची.
जनजागृती खूपच झाली ,
रोपे जोमात डुलू लागली.

लावली रोपे आता प्रतिक्षा पावसाची ,
गरज आता पाणी आणि मातीची.
जपणूक करूया वृक्षांची ,
चिंता हरेल भविष्याची.

आभाळ बोलले धरतीला ,
वृक्ष माझा सखा.
बोलून गेला आधी ,
हेच आमचा तुका.

भविष्यातील सुखमय जगणे
मानवा तुझ्याच रे हाती.
वृक्षारोपण, संवर्धनाने ,
वाचव तू आता धरती.

---------------------