Tuesday, 28 February 2017

माझा आवडता कवी

मराठी राजभाषानिमीत्त  
    काव्यलेखन
माझा आवडता कवि

         कुसुमाग्रज

दिन आजचा सुदिन जाहला,
कुसुमाग्रज ते जन्मा आले .
ज्ञानपंढरी धन्य जाहली ,
सकल जन हे कृतार्थ झाले .

प्रभुत्व तयांचे मराठीवरती ,
सांगे काव्यसंग्रह 'विशाखा'.
आस वाचकांची पुर्ण करण्या ,
ऊघडल्या ग्रंथालयाच्या शाखा.

अजरामर झाली ती रचना,
'ययाती' अन्  'देवयानी .
मानवतेचा कळवळा प्रकटे ,
नाजुक त्या भावनांनी .

'नटसम्राट' तो खरा जाहला ,
मानवस्वभाव तो प्रगटला .
'ज्ञानपिठ' सन्मान मिळाला ,
वंदन त्या र्रूषितूल्य जिवाला .


श्रीमती माणिक क.नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापुर ,416106
9881862530

Monday, 27 February 2017

माझी नजर

प्रेमकविता

         माझी नजर

पाहता तुला झुकते,खालीमाझीनजर .
पण राहतोस तू असा,
सदैव डोळ्यासमोर .

मनात तुझे प्रतिबिंब ,
डोळे माझे ओलेचिंब .
सदैव शोधते ,माझी ही नजर,
राहतोस तू सदैव डोळ्यासमोर.

बेचैन मनाची तू शांती ,
प्रेरणेची घडवी तू क्रांती .
पाहती तू कुठे कसा माझी नजर ,
पण राहतोस  तू सदैव डोळ्यासमोर .

प्रेम माझे तुजवरी ,
दाटले ते माझ्या ऊरी .
व्यक्त करण्या तडफडते माझी नजर ,
राहतोस तू सदैव डोळ्यासमोर



श्रीमती माणिक क.नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर . 416106
 9881862530

माय मराठी

*--------------------------*
*२७ फेब्रुवारी*

*कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या व*
*मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!*
*--------------------------*


      📚  माय मराठी 📚

  माय मराठी माझी माता ,
  नाही ऊणे कुठे सापडणार.
  गर्व असणार नेहमीच ,
  मान अभिमानाने उंचावणार.

  वळवावे तशी वळते ही ,
  अर्थ घेऊ समजाऊन .
  गरज आहे त्यासाठी ,
  ऐकायची ती मन लावून .

  माता जशी समजून घेते ,
  पोटच्या लेकराला .
  वाट करुन देते ही ,
  मनातील भावनेला .

  बाज हिचा असे वेगळा ,
  सानथोरांची ही भाषा .
  नसे वाटे ही परकी ,
  आहे सर्वांचीच आशा .


   ✍ श्रीमती माणिक नागावे
 कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
 जि.कोल्हापूर .416106.
  9881862530.

👑👑👑👑👑👑👑