Sunday, 24 July 2016

सुखी जगण्याचा मंत्र

जीवनात सुखाचे व दुःखाचे असे अनेक प्रसंग येत असतात. आपण सुख आले कि हुरळून जातो व दुःखात निराश होऊन. हे होतच राहत सुख व दुःख ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण असे रात्री मागून दिवस व दिवसामागून रात्र येतच असते. हे आपण थांबवू शकत नाही किंवा टाळू शकत नाही यावर एकच उपाय राहतो तो म्हणजे आपणाला हि पृथ्वी सोडायला लागेल ते आपल्याला शक्य नाही जे आहे ते आपणाला स्वीकारायला पाहिजे. तुम्ही जीवनातील सुखाच्या क्षणी सर्व चिंता, काळजी विसरली जाते तेंव्हा तुम्ही सुखाचा खऱ्या अर्थाने उपभोग घेत असता. त्यावेळी दुःख एकएक करून तुमच्या पासून दूर होऊ लागते. कोणत्याही व्यक्तीला दुःख नको असते हे जरी खरे असले तरी त्याची कारणे कोठे ना कोठे आपल्या हातून नकळत झालेल्या चुकांमुळे अशी दुःख आपल्यावर ओढवली जात असतात. अशा दुःख पासून वेळीच सावध होणे गरजेचे असते नाहीतर नैराश्य येऊन तुमची सद्सदविवेक बुद्धी काम कारेनाशी होते त्यापासून स्वतः च्या मनामध्ये नकारात्मकता वाढीस चालना मिळते हे लक्षात ठेवा.

नकारात्मक विचारांचे प्राबल्य वाढले की मनुष्य दिशाहीन होतो. यावर एकमेव उपाय म्हणजे स्वतः विचारसरणी सकारात्मक ठेवणे होय. सकारात्मकता म्हणजे नेमके काय? सकारात्मक विचार म्हणजे आपण स्वतः ची बुद्धी, मन जागृत ठेऊन चांगला विचार करून दूरदृष्टीने यशासाठी सतत प्रयत्न करणे, यश मला मिळणारच हि मानसिकता तयार करणे होय.

कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना त्याविषयी सर्व माहिती करून घेतली पाहिजे. त्याच बरोबर तशी मानसिकता बनत असते मग काम करताना त्यातील यश अपयश याची जाणीव तुम्हाला येते आणि अडथळा बनणाऱ्या गोष्टी तुम्ही वेळीच सावरून यशस्वी होऊ शकता. जरी त्यातून हि अपयश आले तर स्वतःचे मन खचत नाही, दुःखी होत नाही